केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात 4% वाढ करुन केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना भेट दिली. त्याचबरोबर सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना देखील एक आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कॅबिनेट बैठकीत उज्ज्वला योजना आणखी एक वर्ष सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात या योजनेचे 9.6 कोटी लाभार्थी आहेत. या योजेनेअंतर्गत एलपीजी सिलेंडरवर 200 रूपये सबसिडी मिळते. या योजनेमुळे भारतातील एलपीजी ग्राहक वाढले आहेत.
Table of contents [Show]
उज्ज्वला योजना योजनेचा लाभ आणखी एक वर्ष (Benefit of Ujjwala Scheme Extended)
सरकारने PMUY च्या अंतर्गत पुढील एक वर्षे लाभार्थीना सबसिडी मिळणार आहे. सरकारने हा कालावधी वाढवला आहे. जागतिक स्तरावरील लिक्वीड व वायू इंधनाची किंमत वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हे अनुदान वार्षिक स्वरूपात दिले जाईल. 14.2 किलो वजनाचे 12 एलपीजी सिलेंडर वार्षिक खरेदी केल्यास प्रति सिलेंडर 200 रूपये इतकी सबसिडी खात्यात जमा होणार आहे.
उज्ज्वला योजनेचे 9.6 कोटी लाभार्थी (9.6 crore beneficiaries)
मार्च 2023 पर्यंत या योजनेचा 9.6 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की या अनुदानासाठी 2022-23 मध्ये 6,100 कोटी रुपये झाला आहे आणि 2023-24 मध्ये 7,680 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते. ठाकूर म्हणाले की, जगभरातील विवीध घडामोडींमुळे एलपीजीची आंतरराष्ट्रीय किंमत वेगाने वाढली आहे. या परिस्थितीत किमतीवर नियंत्रण ठेवणे सरकारचे काम आहे.
आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन देण्याच्या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, तुम्हाला प्रत्येक कनेक्शनसाठी 1600 रुपये, गॅस शेगडी खरेदी करण्यासाठी आणि सिलेंडर रिफिलिंगसाठी बिनव्याजी कर्ज मिळते.
आवश्यक कागदपत्रे (Necessary documents PMUY)
खालील कागदपत्रे सादर केल्यास मिळेल योजनेचा लाभ
- जातीचा पुरावा
- एक पासपोर्ट साइज फोटो
- फोटो आयडी पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- बीपीएल रेशन कार्ड
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक
- बँक पासबुक किंवा जन धन बँक खाते तपशील
उज्ज्वला कनेक्शन घेण्यासाठी पात्रता निकष
- अर्जदाराचे वय 18 वर्षे (केवळ महिला) असावे.
- घरात कोणत्याही OMC कडून इतर कोणतेही LPG कनेक्शन नसावे.
- यापैकी कोणत्याही प्रवर्गातील प्रौढ महिला - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), सर्वाधिक मागासवर्गीय (MBC), अंत्योदय अन्न योजना (AAY), चहा आणि पूर्व चहाच्या बागेतील जमाती, वनवासी, बेटे आणि नदी बेटे क्लस्टरमध्ये राहणारे लोक, SECC कुटुंबांतर्गत (AHL TIN) सूचीबद्ध केलेले किंवा 14 पॉइंट नुसार गरीब व्यक्ती पात्र आहे.
(Source : www.navbharatimes.com)