भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल (Cricketer KL Rahul) आणि अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हे आज लग्नबंधनात (Athiya Shetty And KL Rahul Wedding) अडकणार आहेत. केएल राहुलची क्रिकेट कारकिर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. पण त्याची जीवनशैली (Cricketer KL Rahul Net Worth) एका मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. केएल राहुलच्या कारकिर्दीबद्दल त्याच्या चाहत्यांना माहीत असेल पण केएल राहुल किती कमावतो? हे तुम्हाला माहिती आहे का? त्याची निव्वळ संपत्ती काय आहे? ते आज जाणून घेऊया.
केएल राहुलची एकूण संपत्ती
केएल राहुलची एकूण संपत्ती सहा दशलक्ष डॉलर्स आहे. केएल राहुल भारतीय रुपयांमध्ये सुमारे 43 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. 20 सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत केएल राहुलचाही समावेश आहे.
केएल राहुलची कमाई
त्याच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर केएल राहुलची कमाई दरवर्षी 25 टक्क्यांनी वाढत आहे. आयपीएल 2021 मध्ये किंग्स 11 पंजाबने त्याला 11 कोटींना खरेदी केले. मुख्यतः क्रिकेटमधून कमाई करण्याव्यतिरिक्त, केएल राहुल पुमा शूज, नेक्सॉन कार, ड्रीम 11 इत्यादी कंपन्यांच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करतो. केएल राहुल एका जाहिरातीसाठी 10 लाख रुपये आकारतो. केएल राहुलचे मासिक उत्पन्न 25 लाखांपर्यंत आणि वार्षिक 10 कोटींपर्यंत आहे.
केएल राहुलचे कार कलेक्शन
केएल राहुलला महागड्या आणि आलिशान कारची आवड आहे. तो अनेकदा अशा कारमध्ये स्पॉट झाला आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अडीच कोटी रुपयांच्या वाहनांचा समावेश आहे. केएल राहुलकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू कार आहेत. त्याच्या मर्सिडीज सी 43 एएमजी सेडानची किंमत सुमारे 75 लाख रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलकडे ऑडी आर8 देखील आहे. या वाहनाची किंमत 2.30 कोटींहून अधिक आहे. 2022 मध्ये केएल राहुलने बीएमडब्ल्यू एसयूव्ही खरेदी केली. या कारची किंमत सुमारे 70 लाख रुपये आहे. केएल राहुलच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर वेलार देखील आहे. या कारची किंमत 83 कोटी रुपयांपासून सुरू झाली आहे.
महागडी घड्याळे आणि ब्रँडेड वस्तूंचा शौकीन
केएल राहुलला महागडे आणि ब्रँडेड कपडे, फुटवेअर आणि अॅक्सेसरीजचा शौक आहे. त्याच्याकडे खूप महागड्या, स्टायलिश आणि ट्रेंडी स्नीकर्सचा चांगला संग्रह आहे. त्याच्या स्नीकर्सची किंमत 80 हजार रुपये आहे. याशिवाय तो ब्लॅक बेल्टच्या बॅगसोबतही दिसला होता. या ब्रँडेड बेल्ट बॅगची किंमत एक लाख 80 हजार रुपये आहे. केएल राहुलच्या महागड्या घड्याळांच्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, त्याच्याकडे डे-डेट रोलेक्स घड्याळ आहे, ज्याची किंमत सुमारे 27 लाख आहे. आठ लाखांमध्ये एक पनेराई, 38 लाख रुपयांमध्ये 18K रोझ स्काय-डवेलर रोलेक्स आणि 38 लाख रुपयांमध्ये ऑडेमार्स पिगेट रॉयल ओक आहे.