Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CWC 2023: समान बक्षीस रक्कमेच्या ‘सामन्यात’ महिला खेळाडूंची स्थिती काय? खरचं समान वेतन मिळते का? वाचा

cricket world cup 2023

आयसीसीने महिला व पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपसाठी बक्षीसाची रक्कम देखील समान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही अनेक खेळांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना समान वेतन मिळताना दिसत नाही.

आजच्या काळात पुरुषांप्रमाणेच स्त्रिया देखील प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना पाहायला मिळतात. स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या करिअरमध्ये पुढे जात आहेत. मात्र, वेतन समानतेसाठीचा लढा अजूनही सुरूच असल्याचे दिसून येते. समान वेतनासाठी कायदे आणली तरीही परिस्थिती बदलेली पाहायला मिळत नाही. क्रीडा स्पर्धांमध्ये देखील हीच स्थिती आहे. 

गेल्याकाही वर्षात समान वेतनाच्याबाबतीत क्रिकेटमधील परिस्थिती बदलताना पाहायला मिळत असून, ही निश्चितच कौतुकास्पद बाब म्हणायला हवी. अनेक क्रिकेट बोर्डांनी महिला व पुरुष दोन्ही संघाच्या खेळाडूंना समान वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने महिला व पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपसाठी बक्षीसाची रक्कम देखील समान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही अनेक खेळांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना समान वेतन मिळताना दिसत नाही. क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या निमित्ताने मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुष व महिलांच्या विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीसाच्या रक्कमेबद्दल जाणून घेऊया.

समान वेतनाबाबत क्रिकेटमध्ये मोठी प्रगती

इतर खेळांच्या तुलनेत समान वेतनाबाबत क्रिकेटमध्ये मोठी प्रगती झाल्याचे पाहायला मिळते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने काही महिन्यांपूर्वीच महिला व पुरुष दोन्ही क्रिकेटपटूंना समान मॅच फी देण्याचा निर्णय घेतला. BCCI व्यतिरिक्त इंग्लंड क्रिकेट बोर्ड, न्यूझीलंड क्रिकेट आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने देखील समान वेतनाचा निर्णय घेतला आहे. 

BCCI च्या या निर्णयानंतर आता पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणेच महिला खेळाडूंना एका वनडेसाठी 6 लाख रुपये, टी20 सामन्यासाठी 3 लाख रुपये आणि कसोटासाठी 15 लाख रुपये मॅच फी दिली जाईल. या निर्णयाआधी महिला खेळाडूंना कसोटीसाठी 4 लाख रुपये, वनडे व टी20 च्या प्रत्येक सामन्यासाठी 1 लाख रुपये फी दिली जात असे.

BCCI च्या समान निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले तरीही वार्षिक कराराच्या रक्कमेमध्ये (Retainership payment system) अद्यापही मोठी तफावत पाहायला मिळते. वार्षिक करारांतर्गत A कॅटेगरीमधील महिला खेळाडूंना 50 लाख रुपये, B कॅटेगरीमधील महिला खेळाडूंना 30 लाख रुपये आणि C कॅटेगरीमधील महिला खेळाडूंना 10 लाख रुपये दिले जातात. मात्र, पुरुष क्रिकेटपटूंच्याबाबतीत ही रक्कम 1 कोटींपासून ते 7 कोटी रुपयांपर्यंत जाते. दोन्ही क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराच्या फीमधील फरक जवळपास 10 पट आहे.  

आयसीसीच्या स्पर्धेत महिलांची पुरुषांशी बरोबरी

क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या आधी आयसीसीने समान बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे. यापुढे आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धेत महिला, पुरुष दोन्ही संघांना समान बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजेत्या संघाला तब्बल 33 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 16 कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे. आयसीसीने आता हा निर्णय घेतला असला तरीही या आधीच्या काही स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम जाणून घेणे गरजेचे आहे. 

आयसीसी स्पर्धेत विजेत्या संघाला मिळालेली बक्षीसाची रक्कम

पुरुष  वनडे वर्ल्ड कप वर्ष

बक्षिसाची  रक्कम

महिला  वर्ल्ड कप वर्ष 

बक्षिसाची  रक्कम

2023

4 मिलियन  डॉलर्स

2022

1.32 मिलियन डॉलर्स

2019

4 मिलियन डॉलर्स

2017

660,00 डॉलर्स

2015

3.75 मिलियन डॉलर्स

2013

2 लाखडॉलर्स (संपूर्ण स्पर्धेसाठी)

फिफा वर्ल्ड कप – अजून मोठी मजल मारण्याची गरज 

फुटबॉल वर्ल्ड ही जगात सर्वाधिक पाहिली जाणारी स्पर्धा. फिफाद्वारे सर्वात प्रथम 1930 साली पुरुषांच्या वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले. तर महिलांची वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यानंतर 61 वर्ष लागली. विशेष म्हणजे फिफाद्वारे 1991 साली महिला वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले असले तरीही वर्ष 2007 पर्यंत या स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कमच नव्हती. 

आजही महिला व पुरुषांच्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील बक्षिसांच्या रक्कमेत प्रचंड मोठा फरक पाहायला मिळतो. नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये विजेत्या स्पेनच्या संघाला 4.29 मिलियन डॉलर्स मिळाले. तर 2022 मध्ये पार पडलेल्या स्पर्धेत पुरुष अर्जेंटिना या विजेत्या संघासाठी ही रक्कम तब्बल 42 मिलियन डॉलर्स एवढी होती.

फिफा वर्ल्ड कपमध्ये विजेत्या संघाला मिळालेली बक्षिसाची रक्कम

पुरुष वर्ल्ड कप वर्ष

बक्षिसाची रक्कम

महिला वर्ल्ड कप  वर्ष 

बक्षिसाची रक्कम

2022

42 मिलियन डॉलर्स

2023

4.29 मिलियन डॉलर्स

2018

38 मिलियन डॉलर्स

2019

4 मिलियन डॉलर्स

2014

35 मिलियन डॉलर्स

2015

2 मिलियन डॉलर्स

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला-पुरुष एकसमान  

विम्बल्डन – टेनिसशी संबंधित सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा. सर्वात जुनी स्पर्धा असली तरीही विम्बल्डनमध्ये समान बक्षीस रक्कम देण्याची सुरुवात इतर तीन ग्रँड स्लॅमनंतर सुरू झाली. या स्पर्धेत बक्षीस रक्कम समानतेचा निर्णय घेण्यासाठी 2007 साल उजडावे लागले. आज विम्बल्डनप्रमाणेच इतर तिन्ही ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन, यूएस ओपन आणि फ्रेंच ओपनमध्ये बक्षिसाची रक्कम समान दिली जाते. 2023 विम्ब्लडन ग्रँड स्लॅममध्ये बक्षिसाची रक्कम 2,350,000 पाउंड ही दोन्ही खेळाडूंसाठी समान होती.

ग्रँड स्लॅममध्ये समान बक्षीस रक्कमेचा निर्णय सहजासहजी घेण्यात आलेला नाही. यासाठी अनेक महिला खेळाडूंनी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. अखेर सर्वात प्रथम 1973 साली US Open स्पर्धेत समान बक्षीस रक्कमेचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 2001 साली ऑस्ट्रेलियन ओपन, 2006 मध्ये फ्रेंच ओपन आणि अखेर 2007 विम्ब्लडनमध्ये दोन्ही खेळाडूंसाठी समान बक्षीस रक्कमेची घोषणा करण्यात आली. 

विम्बल्डन स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम

वर्ष

पुरुष एकेरी

महिला एकेरी

1968

2000

750

1969

3000

1500

1970

3000

1500

1971

3750

1800

1972

5000

3000

1973

5000

3000

1974

10000

7000

1975

10000

7000

1976

12500

10000

1977

15000

13500

1978

19000

17100

1979

20000

18000

1980

20000

18000

1981

21600

19400

1982

41667

37500

1983

66600

60000

1984

100000

90000

1985

130000

117000

1986

140000

126000

1987

155000

139500

1988

165000

148500

1989

190000

171000

1990

230000

207000

1991

240000

216000

1992

265000

240000

1993

305000

275000

1994

345000

310000

1995

365000

328000

1996

392500

353000

1997

415000

373500

1998

435,000 

391,500 

1999

455,000 

409,500 

2000

477,500 

430,000 

2001

500,000 

462,500 

2002

525000

486,000 

2003

575,000 

535,000 

2004

602,500 

560,500 

2005

630,000 

600,000 

2006

655,000 

625,000 

2007

700,000 

700,000 

2008

750,000 

750,000 

2009

850,000 

850,000 

2010

1,000,000 

1,000,000 

2011

1,100,000 

1,100,000 

2012

1150000

1150000

2013

1600000

1600000

2014

1760000

1760000

2015

1880000

1880000

2016

2000000

2000000

2017

2200000

2200000

2018

2250000

2250000

2019

2350000

2350000

2021

1700000

1700000

2022

2000000

2000000

2023

2350000

2350000

सोर्स - wimbledon.com

* सर्व रक्कम पाउंड्समध्ये

ग्रँडस्लॅममधील समान बक्षीस रक्कमेचा निर्णय नक्कीच चांगला आहे. या गोष्टी महिला टेनिसची वाढती लोकप्रियता तर दर्शवतातच, सोबतच लैंगिक समानतेच्या दिशेने उचलले हे एक चांगले पाऊल नक्कीच आहे. मात्र, ग्रँडस्लॅमच्या तुलनेत इतर टेनिस स्पर्धेत अनेकदा बक्षिसाच्या रक्कमेत असमानता दिसून येते. 

इतर खेळात बक्षिसाची रक्कम काही प्रमाणात असमान

खेळांमध्ये महिलांचा सहभाग वाढला असला तरीही अनेक आव्हाने आजही कायम आहेत. एकीकडे क्रिकेट, टेनिस सारख्या क्रीडा स्पर्धेतील समान बक्षिस रक्कमेचा सामना महिलांनी जिंकला असला तरीही फुटबॉल व इतर वैयक्तिक खेळांमधील लढा अद्याप सुरूच आहे. समान वेतनासोबतच महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत मिळणाऱ्या ट्रेनिंग सुविधा देखील अपुऱ्या असल्याचे दिसून येते. 

 बीबीसीच्या 2021 च्या रिपोर्टनुसार, 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमुख क्रिडा स्पर्धेत दोन्ही खेळाडूंना समान वेतन दिले जाते. सर्वाधिक वेतन फरक प्रामुख्याने फुटबॉल, गोल्फ आणि बास्केटबॉलमध्ये पाहायला मिळतो. महिला एनबीए खेळाडूंचे सरासरी वेतन हे पुरुष एनबीए खेळाडूंच्या तुलनेत 110 पट कमी आहे.

भारतीय टेबल टेनिस महासंघाने देखील मे 2022 मध्ये घोषणा केली होती की, सर्व देशांतर्गत स्पर्धेमध्ये महिला व पुरुषांसाठी बक्षिसाची रक्कम समान असेल. अमेरिकेच्या महिला फुटबॉल खेळाडूंना देखील समान वेतनासाठी मोठा लढा द्यावा लागला. दिर्घकाळ चालेल्या न्यायालयीन लढ्यानंतर अखेर अमेरिकन फुटबॉल महासंघ समान वेतनासाठी तयार झाला.  खेळांमध्ये समान वेतनाबाबत झालेली ही प्रगती नक्कीच वाखण्याजोगी असली तरीही समान संधी, नेतृत्व, ट्रेनिंग सुविधा, स्पॉन्सरशिप, मीडिया कव्हरेज समानतेसाठीचा ‘सामना’ महिला खेळाडूंना भविष्यात जिंकावा लागणार आहे.

खेळ

स्पर्धा

पुरुष (2021)

महिला (2021)

पुरुष (2019)

महिला (2019)

पुरुष (2017)

महिला (2017)

बॅडमिंटन

वर्ल्ड टूर (एकेरी)

85,855

85,855

85,855

85,855

62,016

62,016

सायकलिंग

बीएमएक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप (फायनल)

6,914

6,914

4,322

4,322

3,200

3,200

गोल्फ

पीजीए चॅम्पियनशिप

1.4 मिलियन

462,326

1.4 मिलियन

414,024

894,054

525,000

ज्यूडो

वर्ल्ड चॅम्पियनशिप (वैयक्तिक)

18,613

18,613

18,613

18,613

19,380

19,380

स्क्वॅश

वर्ल्ड चॅम्पियनशिप

52,003

52,003

52,003

52,003

37,210

37,210

टेबल टेनिस

129,009

129,009

71,664

71,664

77,520

77,520

कुस्ती

रँकिंग सीरिज

7,168

7,168

2,172

2,172

-

-

व्हॉलीबॉल

बीच- वर्ल्ड टूर फायनल

107,645

107,645

28,671

28,671

77,520

77,520

स्विमिंग

वर्ल्ड चॅम्पियनशिप

-

-

14,327

14,327

15,504

15,504

अ‍ॅथलेटिक्स

डायमंड लीग

21,464

21,464

35,772

35,772

38,760

38,760

तिरंदाजी

वर्ल्ड चॅम्पियनशिप

18,736

18,736

15,614

15,614

15,000

15,000

सोर्स - बीबीसी.कॉम सर्व आकडेवारी पाउंड्समध्ये

खेळांमध्ये समान बक्षीस रक्कमेला कधी सुरुवात झाली?

आयसीसीने यावर्षी सर्व स्पर्धांसाठी समान रक्कमेची घोषणा केली असली तरीही अनेक खेळांमध्ये याची आधीच सुरूवात झाली आहे. सर्वात प्रथम 1950 साली घोडेस्वारी वर्ल्ड कप फायनलमध्ये समान बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली होती. तर यूएस ओपनमध्ये 1973 साली हा निर्णय घेण्यात आला.

वर्ष

प्रमुख स्पर्धा

1950

घोडेस्वारी वर्ल्ड कप

1973

यूएस ओपन

1979

बॅडमिंटन वर्ल्ड टूर

1982

लंडन मॅरोथॉन

1987

व्हॉलीबॉल बीच वर्ल्ड चॅम्पियनशिप

1997

अ‍ॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप

2006

तिरंदाजी वर्ल्ड कप

2006

स्कीइंग वर्ल्ड कप

2007

विम्बल्डन टेनिस स्पर्धा

2007

स्विमिंग वर्ल्ड कप

2008

ज्यूडो वर्ल्ड चॅम्पियनशिप

2013

सायकलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप

2013

तायक्वांदो ग्रँड प्रिक्स फायनल

2017

स्क्वॅश वर्ल्ड चॅम्पियनशिप

2018

क्रिकेट बिग बॅश लीग

2019

हॉकी प्रो लीग

2022

बीसीसीआय - समान मॅच फी

2023

आयसीसी स्पर्धा

पुरुष-महिला खेळाडूंना वेतनामध्ये फरक का?

पुरुषांच्या स्पर्धांना अधिक प्रेक्षक - कोणतीही क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली की नाही हे प्रेक्षकांच्या उपस्थितीवरून ठरत असते. महिलांच्या तुलनेत पुरुष खेळाडूंच्या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. केवळ मैदानावरच नाही तर टीव्ही व्ह्युअरशिपमध्ये या स्पर्धा आघाडीवर असतात. अनेकदा पुरुष क्रीडा स्पर्धांना महिलांच्या स्पर्धेच्या तुलनेत अधिक मीडिया कव्हरेज मिळत असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम स्पॉन्सरशिप आणि उत्पन्नावर पाहायला मिळतो.

स्पॉन्सरशिप आणि उत्पन्न – क्रीडा स्पर्धेच्याबाबतीत प्रेक्षकसंख्या, स्पॉन्सरशिप, उत्पन्न या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. प्रेक्षकसंख्या जास्त असल्याने पुरुषांच्या क्रीडा स्पर्धेसाठी अधिक गुंतवणूक केली जाते. स्पॉन्सरशिप, तिकीटांची जास्त किंमत, टीव्ही प्रक्षेपण हक्क यामुळे या स्पर्धांद्वारे मिळणारे उत्पन्न महिला क्रीडा स्पर्धेंच्या तुलनेत खूपच जास्त असते. यामुळे महिला खेळाडूंना कमी वेतन मिळत असल्याचे दिसून येते. 

समानता गरजेची – गेल्याकाही वर्षात महिला व पुरुष खेळाडूंचे वेतन समान पातळीवर आणण्यासाठी बरेच प्रयत्न झाले आहेत. मात्र, यावर अजूनही काम होणे गरजेचे आहे. महिला क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक गुंतवणुकीची गरज आहे. महिला प्रीमियर लीग, महिला कबड्डी लीग सारख्या स्पर्धा महिला खेळाडूंसाठी एक चांगले व्यासपीठ ठरत आहेत. याशिवाय, खेळाशी संबंधित नियामक मंडळात महिलांचे प्रमाण वाढवणे, महिला खेळाडूंना ट्रेनिंगसाठी चांगल्या सुविधा पुरवणे देखील आवश्यक आहे.