Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card Use: भारतीयांची क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग 47% नी वाढली; काय आहेत कारणे?

Credit Card Use

भारतामध्ये क्रेडिट कार्डचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2023 आर्थिक वर्षात भारतीयांची क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग 47 टक्क्यांनी वाढली. यात ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वात जास्त क्रेडिट कार्डचा वापर झाला. बँकांकडूनही क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्यासाठी विविध सवलती देण्यात येतात. तसेच प्लास्टिक मनीचा म्हणजेच कार्ड पेमेंट पर्यायाचा वापर प्रत्येक महिन्याला वाढत आहे.

Credit Card Use: भारतामध्ये प्लास्टिक मनीचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI data on Credit Card Spend) आकडेवारीतून समोर आले आहे. क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करण्याचा कल वाढत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये क्रेडिट कार्डचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढला. ऑनलाइन शॉपिंगसाठी क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर होतोय. इ-कॉमर्स क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असून कंपन्यांकडून ऑनलाइन शॉपिंगवर विविध ऑफर्स देण्यात येतात. क्रेडिट कार्डवरील सवलतींमुळे वस्तू स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांचाही ऑनलाइन खरेदी वाढत आहे.

2022-23 मध्ये क्रेडिट कार्डवरील खर्च किती? 

2022-23 मध्ये क्रेडिट कार्डद्वारे नागरिकांनी 14 ट्रिलियन रुपये एवढा खर्च केला. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या म्हणजेच मार्च महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे 1.37 ट्रिलियन एवढा खर्च झाला. गरजेच्या तसेच विरंगुळा म्हणून होणाऱ्या शॉपिंगसाठी क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे. तसेच घरगुती बिल पेमेंटसाठीही क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे. मागील सलग 13 महिन्यांपासून क्रेडिट कार्डवरील खर्च मासिक 1 ट्रिलिनयच्या पुढेच आहे. यातील एकूण व्यवहारांपैकी इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 63% व्यवहार झाले.

FY23 मधील क्रेडिट कार्डबाबतची आकडेवारी

2022-23 आर्थिक वर्षात 1 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड बँकांनी ग्राहकांना वाटली. 2021-22 च्या आकडेवारीचा विचार करता ही संख्या जास्त आहे. (How many Indian use Credit Card?) मार्च एंडपर्यंत क्रेडिट कार्डची आउटस्टँडिंग रक्कम (देय रक्कम) साडेआठ कोटी रुपये इतकी आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा मार्च महिन्यातील वापर 54% तर आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर 20%, HDFC बँक 14%, SBI बँक 11% वाढला. इतर बँकांच्याही क्रेडिट कार्डचा वापर वाढतच आहे. 

मार्च 2023 मध्ये अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डची आउटस्टँडिंग रक्कम 1 कोटी 20 लाखांपेक्षाही जास्त होती. अॅक्सिस बँकेने सीटी बँकेचा क्रेडिट कार्ड व्यवसाय अधिग्रहण केल्यानंतर बँकेचा एकूण व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाकडील क्रेडिट कार्डची आउटस्टँडिंग रक्कम 1 कोटी 60 लाखांपेक्षाही जास्त आहे. तर एचडीएफ बँकेकडील आउटस्टँडिंग रक्कम 1 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त आहे.

क्रेडिट कार्डचा वापर वाढण्यामागील कारणे?

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे भारतीयांची शॉपिंग रोडावली होती. मात्र, कोविडसाथ संपल्यानंतर बाजारपेठा व्यवस्थित सुरू झाल्या. कंपन्यांनी विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना विविध ऑफर्स देण्यास सुरुवात केली. यातील अनेक ऑफर्स क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या खरेदीवर देण्यात आल्या. त्याचा ग्राहकांनीही फायदा उठवला. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोर चांगला आहे त्यांना नवीन क्रेडिट कार्ड देण्यासाठी बँकांचे दररोज कॉल्स येत असतात. मात्र, सिबिल स्कोर कमी असणाऱ्यांना कार्ड देण्यास बँका उत्सुक नसतात. झिरो प्रोसेसिंग फी, झिरो कॉस्ट इएमआय अशा ऑफर सर्सास क्रेडिट कार्डवर मिळतात. तसेच कार्ड देताना अनेक बँका कोणतेही शुल्क बँका आकारत नाहीत.