क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड वाढला आहे. कारण, त्याचा वापर वाढण्यासाठीच्या गोष्टी मार्केटमध्ये आहेत. जसे की, एखादा लॅपटाॅप घ्यायचा आहे, मोबाईल घ्यायचा आहे. मग क्रेडिट कार्ड आहेच की, त्यावर मिळणारी आॅफर बाजूलाच राहते. कारण, तो नो काॅस्ट ईएमआय'मध्ये असतो. याचाच ग्राहकाला जास्त आनंद असतो. पण, जेव्हा तुम्ही याचा चुकीच्या पद्धतीने वापर करता. त्यावेळी तुम्हाला आर्थिक भूर्दंड भरावा लागतो. त्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे नुकसान होऊ शकतं. ते पाहूया.
Table of contents [Show]
कार्डमध्ये जास्तीचा पैसा ठेवणं टाळा
सर्वांत मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे क्रेडिट कार्डमध्ये जास्तीचं बॅलन्स ठेवणं. एवढंच नाहीतर काही लोकांचा असा समज आहे की, क्रेडिट कार्डमध्ये बॅलन्स ठेवल्याने क्रेडिट स्कोअर सुधारतो. पण, तसं नाही आहे. तुम्ही क्रेडिट कार्डमध्ये बॅलन्स लावून ठेवत असाल तर त्याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. तसेच, पैसे ही खर्च होतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जितका वापर कमी तेवढं क्रेडिट स्कोअरसाठी चांगलं आहे. फिकोच्या स्टडीनुसार, काही लोकांचा क्रेडिट कार्डचा वापर कमी असूनही स्कोअर चांगला आहे. तसेच, त्यांचं त्यातील बॅलन्सही कमीच असते, त्यांना मिळालेल्या क्रेडिट लिमिटपैकी ते फक्त सरासरी 7% त्याचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही याचा वापर करताना त्यात जास्तीचं बॅलन्स ठेवणं टाळा. फक्त कामापुरतं ठेवा.
प्लॅनिंग न करता वस्तू घेवू नका
तुम्हाला नेहमीच कमीतकमी रक्कम भरावी लागणार आहे, हा सल्ला नाही आहे. पण, जेवढं भरू शकतो तेवढंच ठरवावं लागणार आहे. कारण, तुम्ही पूर्ण बिल भरले नाही तर तुम्हाला कर्जाला तोंड द्यावे लागेल तसेच, त्यावर व्याजही भरावे लागेल. त्यामुळे परिस्थिती पाहूनच हफ्ता ठरवा. कमीतकमी भरत असल्यास ते कर्ज चुकवायला तुम्हाला महिने-वर्ष लागतील. पण, त्याचं व्याजही जास्त असणार आहे. त्यामुळे हे सगळं सहन करायचं नसल्यास, कोणतीही मोठी वस्तू घेण्याआधी प्लॅन बनवा, त्यानुसार पेमेंट वेळेवर देत राहा. कारण, एक जरी हफ्ता चुकवला तर तुम्हाला व्याजासह ती रक्कम भरावी लागणार आहे.
पेमेंट वेळेवर भरण्याशिवाय पर्याय नाही
जर तुम्ही एखादं पेमेंट चुकवलं आणि महिना झाला तरी तुम्ही भरू शकले नाहीत. तर याचा गंभीर परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होवू शकतो. फिकोच्या आकडेवारीनुसार, तुम्हाला पेमेंट चुकवून 30 दिवस झाल्यास, 17 ते 83 अंकांची घसरण आणि 90 दिवस झाल्यास 27 ते 133 अंकांची घट होवू शकते. ही गोष्ट झाल्यास, तुम्हाला लोन मिळणे अवघड होऊ शकते. कारण, तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. याचबरोबर तुमच्याकडून लेट शुल्क ही आकारला जातो. या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही ऑटो पे'ही सेट करू शकता.
जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका
क्रेडिट कार्ड बंद करत असाल तर ही सर्वांत मोठी चूक ठरणार आहे. कारण, तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं आहे. ते याच क्रेडिट कार्डवरून कळणार आहे आणि जेवढी तुमची क्रेडिट हिस्ट्री तेवढा चांगला तुमचा क्रेडिट स्कोअर असणार आहे. त्यामुळे कार्ड बंद करण्याआधी थोडा विचार करून ते करा. पण, शक्यतो जुने कार्ड बंद करू नका. पण, त्याचा वार्षिक चार्ज जास्त असेल आणि वापर काहीच नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही ते बंद करू शकता. पण, ते बंद केल्यावर त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होवू शकतो. हे मात्र नक्की आहे.