• 28 Nov, 2022 16:34

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड स्टेटमेंट म्हणजे काय?

Credit Card FAQ

Credit Card Statement Billing मध्ये क्रेडिट कार्डवर केलेल्या व्यवहारांचा तपशील असतो. प्रथमच क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी हे स्टेटमेंट समजून घेणं गरजेचं आहे.

Credit Card FAQ : प्रथमच क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड स्टेटमेंट समजून घेणं थोडं अवघड जाऊ शकतं. कारण त्यात खूप तपशीलवार माहिती दिलेली असते; जी कार्डधारकासाठी खूप महत्त्वाची आहे. क्रेडिट कार्डचा वापर करताना त्याची थकबाकी आणि इतर गोष्टी समजण्यास सुलभता व्हावी यासाठी क्रेडिट कार्ड कंपनीकडून डिटेल स्टेटमेंट दिले जाते. त्यात प्रत्येक बाबी या पार्टवाईज मांडून सांगितल्या जातात.

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट म्हणजे काय? What is Credit Card Statement?

क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये बिलिंग कालावधीत केलेल्या सर्व व्यवहारांचा तपशील दिलेला असतो. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट हे एक ते दोन पानांचे असू शकते. याची संख्या प्रत्येकाच्या व्यवहारांच्या संख्येवर अवलंबून असते. या स्टेटमेंटमध्ये क्रेडिट कार्डवर केलेल्या व्यवहारांचे तपशील, मागील महिन्याचे पेमेंट, थकबाकी आणि रिवॉर्ड पॉइंट इत्यादी बद्दलची माहिती दिलेली असते.

कोणत्याही कंपनीच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर खालीलप्रमाणे तपशील आपण पाहू शकतो.

  • कार्डधारकाचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, ईमेल आणि पत्ता
  • खात्याचे तपशील जसे की फायनान्स चार्जेस, ओपनिंग बॅलन्स, एकूण थकबाकी, भरलेले बिल इत्यादी.
  • मागील एक महिन्यातील थकित बिलाची रक्कम, ओव्हर-लिमिट चार्जेस, चालू महिन्याच्या बिलाची रक्कम.
  • क्रेडिट कार्डवर केलेल्या व्यवहारांची तारीख, रक्कम आणि त्याबाबतचे इतर तपशील
  • क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्सची ओपनिंग बॅलन्स, अॅडजस्ट बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्ससह रिवॉर्ड पॉइंट्सची माहिती दिलेली असते.
  • ग्राहकांसाठीच्या वेगवेगळ्या ऑफर्स
  • बँकेच्या अटींबाबत महत्त्वाची माहिती


 क्रेडिट युटिलायझेशन रेशो काय आहे? What is the credit utilization ratio?

क्रेडिट युटिलायझेशन रेशो किंवा क्रेडिट युटिलायझेशन रेट म्हणजे एकूण उपलब्ध क्रेडिट मर्यादेतून वापरल्या जाणार्‍या क्रेडिटची टक्केवारी असते. साध्या सूत्राचा वापर करून क्रेडिट युटिलायझेशन रेशोची मोजणी करता येऊ शकते.

क्रेडिट युटिलायझेशन रेशो = (एकूण थकबाकी रक्कम/एकूण उपलब्ध क्रेडिट) X 100

कोणत्याही क्रेडिट कार्ड धारकाचा क्रेडिट स्कोअर मोजताना क्रेडिट ब्युरोकडून क्रेडिट युटिलायझेशन रेट (credit utilization rate) हा महत्त्वाचा घटक मानला जातो.