Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डवर खरेदी करण्याचे लिमिट असते का?

Credit Card FAQ

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो.

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डबद्दल माहिती जाणून घेतांना तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, त्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. त्यापैकी एक म्हणजे, क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येते; पण मग याला काही मर्यादा आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, असं आहे. क्रेडिट कार्डवरून पेमेंट करण्यावर मर्यादा आहेत. त्याला क्रेडिट मर्यादा असे म्हणतात. म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला दिलेली कमाल रक्कम. ही क्रेडिट मर्यादा कार्डधारकाचा प्रोफाइल, परतफेड क्षमता, CIBIL क्रेडिट रिपोर्ट यावर अवलंबून असते. तुम्हाला जर तुमची क्रेडिट मर्यादा वाढवून घ्यायची असेल तर तुम्ही कंपनीकडे अर्ज करू शकता.

अर्ज केल्यानंतर सेवा देणाऱ्या कंपनीकडून अधिकची कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. जसे की, तुमचा क्रेडिट स्कोर (Credit Score), आर्थिक स्थिती. या कागदपत्रांवरून तुम्ही क्रेडिट मर्यादा वाढवण्यास पात्र असाल तर तुमची क्रेडिट मर्यादा वाढवली जाते. तसेच तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरत असाल तर तुम्ही कंपनीकडे वार्षिक क्रेडिट मर्यादा वाढवण्यासाठी सुद्धा अर्ज करू शकता.

सर्व क्रेडिट कार्डला वार्षिक फी आणि जॉयनिंग फी असते का? 

या प्रश्नाचे उत्तर नाही आणि हो असे दोन्ही आहे. कारण बॅंकांनुसार किंवा फायनान्स कंपन्यांच्या पॉलिसीनुसार क्रेडिट कार्डवर वार्षिक आणि जॉयनिंग फी घेतली जाते. बाजारात शून्य वार्षिक फी आणि कोणत्याही जॉयनिंग फी विनाही क्रेडिट कार्ड मिळते. उदा. Amazon Pay ICICI हे कार्ड कोणत्याही फी शिवाय मिळते. पण क्रेडिट कार्डवर जॉयनिंग आणि वार्षिक फी व्यतिरिक्त ओव्हर लिमिट फी, लेट पेमेंट फी, फॉरेक्स फी यासारखी फी लागू असते.

क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास त्यावर व्याजदर आकारला जातो का? 

होय,  क्रेडिट कार्डच्या बिलाची रक्कम दिलेल्या मुदतीत पूर्ण न भरल्यास ती सेवा देणाऱ्या कंपनीकडून किंवा बॅंकेकडून दंड म्हणून त्यावर व्याज आकारले जाऊ शकते. कार्डधारकाच्या शिल्लक राहिलेल्या रकमेवर 3-4% व्याज आकारले जाते. (व्यवहाराच्या तारखेपासून मोजलेल्या दिवसांची संख्या X एकूण थकबाकी रक्कम X दरमहा व्याज दर X 12 महिने) / 365 या सूत्राचा वापर करून ही रक्कम काढली जाते.

क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढू शकतो का? त्या प्रक्रियेवर अतिरिक्त चार्ज लावण्यात येतो का? 

होय, एटीएममधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापर केला जाऊ शकतो. पण, क्रेडिट कार्ड वापरून कॅश काढण्यासाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागतो. जो 2.5 - 3.5% या दरम्यान असू शकते.

क्रेडिट कार्डवर फॉरेन एक्सचेंज मार्क-अप फी किती आकारली जाते?

जेव्हा क्रेडिट कार्डवरून आंतरराष्ट्रीय व्यवहार केला जातो, तेव्हा बँका आणि क्रेडिट कार्ड नेटवर्क कंपन्या चलन रूपांतरित करण्यासाठी कार्डधारकांकडून शुल्क आकारतात. जसे Visa आणि MasterCard कंपनीद्वारे 1% शुल्क आकारले जाते. तर बऱ्याच बँका या व्यवहार केलेल्या एकूण रकमेच्या 0.99 टक्के ते 2.5 टक्के मार्क-अप चार्ज आकारतात.

क्रेडिट कार्डवरील फॉरेक्स मार्क-अप चार्ज उदाहरणाद्वारे समजून घेऊ. उदाहरणार्थ, एका वस्तुच्या खरेदीसाठी कार्डद्वारे 3,000 USD दिले. एका अमेरिकत डॉलरचे मूल्य भारतीय रुपयांत 80 रुपये आहे, असे आपण समजू. म्हणजे त्या वस्तुसाठी 2,40,000 हजार दिले गेले. आता क्रेडिट कार्ड कंपनी मार्क-अप फी म्हणून 3.5 टक्के दर आकारते. असे असल्यास कार्डधारकाला 2,40,000 हजार रुपयांबरोबरच मार्क-अप फी म्हणून 8,400 रुपये भरावे लागतील. तसेच या रकमेवर 18 टक्के GST सुद्धा आकारला जाऊ शकतो.