Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Student Credit Card: विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट कार्डची सुविधा, जाणून घ्या कार्डची वैशिष्ट्ये

Credit Card

तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हांला देखील क्रेडिट कार्ड मिळू शकतं, ते देखील एकदम कमी व्याजदरात! काय म्हणता, विश्वास बसत नाहीये? चला तर जाणून घेऊया काय आहे ही स्पेशल स्कीम.

Credit Card for Students: विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड मिळू शकते का? कुठलीही कमाई न करणारे विद्यार्थी कसे काय क्रेडिट मिळवू शकतात? तसा काही कायदा आहे का? बँका खरेच विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड देतात का? असे अनेक प्रश्न अनेकदा विचारले जातात. याचं मुख्य कारण म्हणजे क्रेडिट कार्डबद्दल असलेलं आपलं अपुरं ज्ञान.

विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड कसे मिळेल? 

जर पालकांनी त्यांच्या मुला-मुलींच्या नावे जर फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) ठेवले असेल तर त्यावर बँक क्रेडिट कार्ड देते. यासाठी विशेष कागदपत्रांची, आर्थिक कमाईची गरज नसते. FD वर क्रेडिट कार्ड मिळते हे आता अनेकांना माहीत आहे.

विद्यार्थ्यांचे पालक जर कुठले क्रेडिट कार्ड वापरत असतील तर त्याच क्रेडिट कार्डवर 'Add on Student Credit Card' बँका देतात, ते देखील मोफत. यासाठी विद्यार्थ्यांना कमाईचे स्रोत वैगेरे दाखवण्याची गरज नसते, विद्यार्थीदशेत विद्यार्थी शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी या कार्डचा वापर करू शकतात.

या विद्यार्थी क्रेडिट कार्डमुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विशेष फरक पडत नाही, कारण सर्व आर्थिक व्यवहारात पालकांचे क्रेडिट कार्ड, मुख्य कार्ड म्हणून गणले जाते. त्यामुळे विद्यार्थी क्रेडिट कार्डचे वेगळे असे क्रेडिट स्कोर मोजले जात नाहीत.

students-documents.jpg

विद्यार्थी क्रेडिट कार्डचे फायदे

वर्तमान स्थितीत शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी हे कार्ड वापरले जात असले तरी याचा भविष्यात देखील फायदा होऊ शकतो. विद्यार्थीदशेत तुम्हांला दिलेले क्रेडिट कार्ड तुम्ही कसे वापरले, पैशांचे व्यवहार कसे केले या आधारावर तुम्हांला क्रेडिट कार्ड मिळू शकते.

क्रेडिट कार्डवर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. कॅशबॅक, रिवार्डस अशा ऑफर्स विद्यार्थ्यांना फायद्याच्या ठरतात. पुस्तक खरेदी, शैक्षणिक सहल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सिनेमा तिकिटे, ऑनलाईन कोर्स, वसतिगृह भाडे आदी गोष्टींवर विद्यार्थी पैसे खर्च करू शकतात.

या क्रेडिट कार्डचे लिमिट फक्त 15,000 रुपये इतके आहे. हे विद्यार्थी क्रेडिट कार्ड असल्यामुळे विद्यार्थ्यांनी वायफळ खर्च करू नये, अनावश्यक कर्ज वाढवू नये यासाठी ही मर्यादा घालून दिली आहे.

या कार्डची वैधता 5 वर्षांसाठी आहे. एकदा की विद्यार्थीदशेतून विद्यार्थी बाहेर पडले की हे कार्ड त्यांच्यासाठी उपयोगी ठरत नाही.

विद्यार्थी क्रेडिट कार्डसाठी पात्रता

  • वयाची 18 वर्षे पूर्ण असावीत
  • शासनमान्य शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असावा
  • पालकांकडे क्रेडिट कार्ड असावे (आई किंवा वडील)
  • पाल्याच्या नावावर FD असावी (पालकांकडे क्रेडिट कार्ड नसल्यास)

आवश्यक कागदपत्रे

  • कॉलेज/ विद्यापीठाचे ओळखपत्र
  • पॅन कार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटोग्राफ
credit-card-student.jpg

आर्थिक शिस्तीसाठी उपयोगी

बऱ्याचदा आपण आपल्या मुला-मुलींशी पैशाबद्दल बोलत नाही. पैशाचे नियोजन कसे करावे, त्याची बचत कशी करावी यावर देखील शक्यतो चर्चा करत नाहीत. विद्यार्थीदशेपासून आपल्या मुला-मुलींना अर्थसाक्षर करणे खूप महत्त्वाचे आहे. क्रेडिट कार्ड वापरताना विद्यार्थ्यांना पैशाचे नियोजन कसे करावे याची सवय लागते. विद्यार्थी क्रेडिट कार्डवर तुलनेने कमी व्याजदर (4%) आकारले जाते. आपण खर्च करत असलेल्या पैशावर व्याज द्यावे लागते हे विद्यार्थी स्वतः अनुभवू लागतात. त्यामुळे बचतीची देखील सवय त्यांना लागते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर या क्रेडिट कार्डला सामान्य क्रेडिट कार्डमध्ये परावर्तित करण्याची सोय देखील बँका देतात. कमाईनुसार कार्डची क्रेडिट मर्यादा देखील वाढवून दिली जाते.

प्रत्येक बँकेचे विद्यार्थी क्रेडिट कार्डविषयी वेगवेगळ्या नियम व अटी आहेत. क्रेडीट कार्ड घेण्यापूर्वी सर्व गोष्टींची शहानिशा करून घ्या.