देशातील आघाडीची जाहिरात कंपनी क्रेऑन्स अँडव्हर्टायझिंग (Crayons Advertising) चा लवकरच आयपीओ (IPO) येत आहे. यासाठी कंपनीने ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) एनएसईकडे दाखल केला आहे. डीआरएचपी (DRHP) नुसार, या आयपीओ (IPO) अंतर्गत, कंपनी बाजारात 64,30,000 फ्रेश इक्विटी शेअर जारी करेल. प्रति शेअर दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स हे या या आयपीओचे बुक रनिंग मॅनेजर आहेत. याशिवाय स्कायलाइन या आयपीओची रजिस्ट्रार आहे. आयपीओ (IPO) आणण्यापूर्वी, कोणतीही कंपनी प्रथम मार्केट एक्सचेंजला याबद्दल सूचित करते.
निधी कुठे वापरणार?
क्रेऑन्स अँडव्हर्टायझिंग (Crayons Advertising) च्या आयपीओमधून उभारलेल्या रकमेपैकी 15.28 कोटी रुपये कंपनीच्या विस्तारासाठी वापरले जातील. तर 14.50 कोटी रुपये खेळत्या भांडवलासाठी वापरले जातील. क्रेऑन्स अँडव्हर्टायझिंग (Crayons Advertising)चे प्रवर्तक कुणाल लालानी आहेत. ही कंपनी सुमारे 35 वर्षे जुनी आहे. ही कंपनी हाय एंड इकोसिस्टम आणि एंड टू एंड टेक कम्युनिकेशन्स सोल्युशन्स प्रदान करते.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
क्रेऑन्स अँडव्हर्टायझिंग (Crayons Advertising) ची एकूण संपत्ती सुमारे 43 कोटी रुपये आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2023 च्या सप्टेंबर तिमाहीत 118 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात यश आले होते. याच कालावधीसाठी कंपनीचा करानंतरचा नफा 6.55 कोटी रुपये होता. कंपनीची प्रति समभाग कमाई (बेसिक आणि डायल्यूटेड) 29.11 इतकी होती. आर्थिक वर्ष 22 साठी, कंपनीने 1 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि 194 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे. क्रेयॉन्सने टाटा मुंबई मॅरेथॉन मोहिमेवरही काम केले, जे जागरूकतेसाठी केस स्टडी म्हणून काम करते. तसेच, गेल्या एका वर्षात, कंपनीला टाटा ने ऐतिहासिक एअर इंडिया ट्रान्जिशन मोहीम 'विंग्स ऑफ चेंज' लाँच करण्यासाठी आणि टाटा क्रोमाचे सर्जनशील आदेश हाताळण्यासाठी नियुक्त केले होते.
जाहिरात बाजारातील वाढीची शक्यता
एक्सपर्ट मार्केट रिसर्चनुसार, 2020 मध्ये भारतीय जाहिरात बाजाराचे मूल्यांकन 67 हजार कोटी रुपये होते. 2022-27 च्या अंदाज कालावधीत, बाजाराने कंपनीची वाढ 11 टक्के दर्शवली आहे. पुढील 2 वर्षात भारतीय जाहिरातींची बाजारपेठ जगात झपाट्याने वाढणार आहे.