Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

KFin Tech IPO: पुढील आठवड्यात ओपन होणार देशातील सर्वांत मोठ्या रजिस्ट्रार कंपनीचा आयपीओ!

KFin Tech IPO

Image Source : www.kcas.kfintech.com

KFin Tech IPO: भारतातील सर्वांत मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेन्सी कंपनी के-फिन टेक (KFin Tech) कंपनीचा आयपीओ येणार असून याचा व्हॉल्यूम 1500 कोटी रुपये इतका असणार आहे.

KFin Tech IPO: भारतातील सर्वांत मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर कंपनी (Registrar & Transfer Company-RTA) के-फिन टेक कंपनीचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) येणार आहे. या आयपीओची प्राईस ब्रॅण्ड प्रत्येक इश्यूसाठी 347-366 रुपये अशी फिक्स करण्यात आली.  हा आयपीओ 19 ते 21 डिसेंबर, 2022 यादरम्यान गुंतवणुकीसाठी ओपन असणार आहे. या आयपीओद्वारे कोणताही नवीन शेअर विकले जाणार नाही. हा आयपीओ पूर्णत: ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS) साठी उपलब्ध आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी (Anchor Investor) हा आयपीओ 16 डिसेंबरला ओपन असणार आहे.

KFin Tech IPO

के-फिन टेक कंपनीने आयपीओ 1500 कोटी रुपयांच्या आयपीओ अंतर्गत 4,09,83,607 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale) द्वारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीचे प्रमोटर जनरल अटलांटिक सिंगापूर फंड आपला हिस्सा कमी करणार आहे. हा आयपीओ 19 ते 21 डिसेंबर या दरम्यान ओपन असणार असून याची प्राईस बॅण्ड 347-366 असणार आहे. यामध्ये 40 शेअर्सचा एक लॉट असणार असून, प्राईस बॅण्डच्या किमतीनुसार, गुंतवणूकदारांना किमान 14640 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

के-फिन टेक कंपनीच्या आयपीओमधील 75 टक्के भाग हा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (पात्र संस्थात्मक खरेदीदार) (Qualified Institutional Buyer-QIB), 15 टक्के भाग नॉन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स (गैर संस्थात्मक गुंतवणूकदार) (Non-Institutional Investors-NII) आणि 10 टक्के भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित असणार आहे. 10 रुपये प्राथमिक मूल्य असलेल्या या शेअर्सचे अलॉटमेंट 26 डिसेंबरला फायनल होण्याची शक्यता असून 29 डिसेंबरला लिस्टिंग होऊ शकते.


KFin Tech कंपनी काय करते?

के-फिन टेक कंपनी ही भारतातील सर्वांत मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर कंपनी आहे. या कंपनीची सेवा भारतासह मलेशिया, फिलीपाईन्स, हॉँगकॉँग या देशातील म्युच्युअल फंड आणि इतर खाजगी रिटायरमेंट योजनांबाबतही सेवा पुरवते. सप्टेंबर, 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ही कंपनी भारतातील 301 म्युच्युअल फंड आणि 192 ॲसेट मॅनेजर्सना सेवा पुरवत आहे. देशातील 42 ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी 25 कंपन्यांना ही कंपनी सेवा पुरवते.