Low Interest Rates On Saving Account : एका अहवालाद्वारे नवीन आर्थिक वर्षातील ग्राहकांची गुंतवणूकीस काय प्राथमिकता आहे आणि काय योजना आहे? ते पूढे आले आहे. ज्यामध्ये असे दिसून आले की, गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांचा सर्वाधिक विश्वास सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खात्यात पैसे ठेवण्यावर आहे. तर काही टक्के ग्राहक स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा किंवा आरोग्य आणि जीवन विम्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. अहवालात असे निदर्शनास आले आहे की, सध्या ग्राहक बचत खात्यात पैसे ठेवणे सुरक्षित मानतात. आणि त्यात पैसे ठेवणे ही त्यांची पहिली पसंती आहे.
Table of contents [Show]
यामागील कारण काय?
अॅक्सिस माय इंडिया कंझ्युमर डेटा इंटेलिजन्स कंपनीने इंडिया कंझ्युमर सेंटिमेंट इंडेक्स (CSI) मध्ये ग्राहकांच्या गुंतवणुकीशी संबंधित अनेक मुद्द्यांची माहिती दिली. या महिन्याच्या CSI सर्वेक्षणात 26 टक्के ग्राहक त्यांच्या ठेवी बचत खात्यात ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. तर 20 टक्के लोकांनी त्यांचे पैसे स्वत:च्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे.
बचत खात्याला महिलांची पसंती
बहुतांश महिलांनी 33 टक्के पैसे बचत खात्यात ठेवण्यास आपली पहिली पसंती दर्शविली आहे. बचत खात्यावरील व्याजदर प्रत्येक बँकेत वेगवेगळे असतात आणि बदलत राहतात. यानंतरही लोकांनी एफडीपेक्षा बचत खाते अधिक पसंत केले आहे. बचत खात्यावर 3.5 ते 4 टक्क्यांपर्यंत सरासरी व्याजदर असतो. आणि एफडीवर 3.5 टक्के ते 9.50 टक्के व्याजदर दिला जातो. व्याजदरात एवढी प्रचंड तफावत असुन देखील महिला बचत खात्यात पैसे ठेवण्यास प्राधान्य देत आहेत.
सोन्यात गुंतवणूकीचीही आवड
अहवालामध्ये मिळालेल्या माहितीनूसार, 16 टक्के लोकांना आरोग्य जीवन विम्यात गुंतवणूक करायची आहे. तर 13 टक्के लोकांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे. तर 8 टक्के लोकांना एफडी आणि आरडी मध्ये गुंतवणूक करायची आहे आणि 7 टक्के लोकांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे.