Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Construction Sector Technology: 'या' तंत्रज्ञानामुळे बांधकाम क्षेत्रात झाला मोठा बदल

Construction Sector Technology

Construction Sector Technology: गेल्या दशकात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या क्षेत्राला गती प्राप्त झाली आहे.

Construction Sector Technology: कोणत्याही क्षेत्रात ज्यावेळी तंत्रज्ञान येतं त्यावेळी त्या क्षेत्राची प्रगती ही होतेच. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात(Real Estate Sector) मोठ्या प्रमाणावर लोक गुंतवणूक(Investment) करायला लागले आहेत. जसे या क्षेत्रातील मार्केटिंग(Marketing) प्रभावी आहे तसेच या क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या दशकात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या क्षेत्राला गती प्राप्त झाली आहे. चला तर या क्षेत्रातील 5 प्रभावी तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (Building Information Modeling)

bim.jpg

क्लाऊड तंत्रज्ञानाच्या(Cloud Technology) उदयामुळे हे तंत्रज्ञान आपले पाय बांधकाम क्षेत्रात घट्ट रोवू शकले आहे. ही एक 3D मॉडेलिंग पद्धत असून ज्यामुळे वापरकर्त्याला आराखडा(view plans), वेळापत्रक(Schedules), खर्चाचे अंदाजपत्रक(Budgets) व 3D दृश्य(3D Views) एकाच वेळी पाहणे शक्य होत आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रोजेक्टचे मॉडेल सर्व भागधारकांना एकाच वेळी पाठवता येते त्यामुळे कोणालाही प्रोजेक्ट संबंधी माहिती कोणत्याही क्षणी तात्काळ व अद्यावत स्वरूपात मिळण्यास मदत होते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समन्वयाचा अभाव(Lack of Coordination) व वादविवाद टाळणे शक्य झाले आहे.

इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet of Things)

iot.jpg

आजकाल स्मार्ट सिटींना मोठ्या प्रमाणात महत्व येऊ लागले आहे त्या पाठीमागे इंटरनेट ऑफ थिंग्स या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने जगाला दिलेले हे तंत्रज्ञान इंटरनेट व भौतिक गोष्टी यांना जोडण्यास व सेन्सरच्या मदतीने माहितीचे रूपांतरण करण्यास मदत करते. या तंत्रज्ञानामध्ये सेन्सरचा वापर(Sensor) करून एखाद्या गोष्टीची चालू स्थिती(Current Status), कामगिरीचा स्तर(Performance Level) तसेच भौतिक स्थितीचे परीक्षण(Physical Condition) करणे यामुळे सहज व सोपे झाले आहे. घरातील छोट्या मोठ्या उपकरणापासून ते बिल्डिंगच्या वेगवेगळ्या घटकामध्ये सेन्सरचा वापर करून त्यावर नियंत्रण ठेवता येणे यामुळेच शक्य झाले आहे. उदा. घर लॉक किंवा उघडणे, टाळी वाजवून लाईट लावणे किंवा बंद करणे, काँक्रिट क्युअरिंग(Concrete Curing) तपासून कामाचा दर्जा व क्वॉलिटी तपासण्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाची मदत झाली आहे. 

3 डी प्रिंटिंग(3D Printing)

additive-manufacturing.jpg

एखादी अभियांत्रिकी डिझाईन सहज स्केल मॉडेल किंवा खऱ्याखुऱ्या घटकामध्ये(Scale Model or Actual Component) रूपांतरित करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग तंत्रज्ञानांमुळे(BIM) 3D प्रिंटिंग सोपे झाले आहे. बांधकाम क्षेत्राचा विचार करता अजूनही हे तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत आहे. परंतु भविष्यकाळात हे तंत्रज्ञान पूर्ण क्षेत्र व्यापून टाकणार आहे.

रोबोट्स (Robots)

robots.jpg

बांधकाम क्षेत्र हे सर्वात कमी अॅटोमेटेड क्षेत्रापैकी एक क्षेत्र असून हे क्षेत्र बहुतांशी बांधकाम मजुरांवर(Construction Labor) अवलंबून असते.परंतु या क्षेत्रातही रोबोटीक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का? 3D प्रिंटर रोबोट्स आपल्या गरजेनुसार मोठी इमारत सुद्धा बांधू शकतात व मोबाईल रोबोट्स 3D प्रिंटिंग हाताळू शकतात. सध्या परदेशामध्ये वीट बांधकामासाठी रिमोट कंट्रोल असणारे रोबोट्स वापरले जात आहेत. बांधकाम क्षेत्राची व्याप्ती पाहता नजीकच्या काळात रोबोट्सचा  वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असून यामुळे बांधकाम क्षेत्रात होणारी जीवात हानी टाळली जाणार आहे.

ड्रोन्स(Drones)

unmanned-aircraft-system.jpg

केवळ लग्न समारंभापुरता ड्रोन((Drone) मर्यादित राहिला नाहीये तर, ड्रोन्सच्या प्रवेशामुळे बांधकाम क्षेत्रात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. प्लॅनिंग(Planning), सर्व्हे(Survey), माहिती गोळा करणे(Information Gathering), परीक्षण करणे, उंच ठिकाणाचे मोजमाप करणे अशी  विविध कामे  ड्रोन्सच्या माध्यमातून कमी खर्चात व जलदगतीने होत असल्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा  वापर बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. कामाच्या ठिकाणी जाऊन आवश्यक रिपोर्ट्स(Reports) पटकन गोळा करण्याकरिता ड्रोन्स हा बांधकाम क्षेत्राला जणू वरदानच ठरला आहे.