Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI: बँकेत वारंवार तक्रार करुनही काम होत नाही? तर मग करा थेट RBI कडे तक्रार, जाणून घ्या प्रोसेस

RBI

Image Source : http://www.hindustantimes.com/

RBI: जर तुमची बँक किंवा NBFC तुमच्याकडून मनमानी शुल्क आकारत असेल आणि वारंवार तक्रारी करूनही त्यावर काही उपाय होत नसेल, तर तुम्ही थेट त्या बँक किंवा NBFC विरुद्ध RBI कडे तक्रार करू शकता. ग्राहकांच्या बँकिंगशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आरबीआयने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.

RBI: अनेक वेळा असे घडते जेव्हा ग्राहकांना त्यांच्या बँक किंवा NBFC कडे कोणतीही तक्रार असते, परंतु त्यांच्यावर कारवाई कशी करावी हे त्यांना माहिती नसते. यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. भारताची मध्यवर्ती बँक, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) लाँच केली आहे, ज्यावर ग्राहक मध्यवर्ती बँकेद्वारे नियमन केलेल्या सर्व वित्तीय सेवा प्रदात्यांविरुद्ध त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. सेंट्रल बँकेच्या कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टममध्ये तुम्ही तक्रार कशी नोंदवू शकता ते जाणून घ्या.

RBI मध्ये बँकेविरुद्ध तक्रार कशी करावी? (How to file a complaint against a bank in RBI?) 

यासाठी, सर्वप्रथम, तुम्हाला RBI च्या  तक्रार पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला File a Complaint वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दाखवलेला कॅप्चा टाकावा लागेल. यानंतर एक नवीन पेज उघडेल आणि त्यावर तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाईल टाकून OTP साठी क्लिक करावे लागेल. 

यानंतर, तुम्हाला बँकेचे नाव आणि तक्रारीचा संपूर्ण तपशील प्रविष्ट करावा लागेल. येथे तुम्ही बँकेकडून भरपाईची मागणीही करू शकता. शेवटी तुम्हाला रिव्ह्यूवर क्लिक करून सबमिट करावे लागेल. यानंतर तुम्हाला तक्रार क्रमांक मिळेल.

ऑफलाइन तक्रार देखील करता येऊ शकते? (Can complain offline also?)

तुम्ही तुमच्या बँकेची तक्रार ऑफलाइन देखील RBI कडे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तक्रारीच्या संपूर्ण डिटेल्ससह RBI ला एक पत्र लिहावे लागेल आणि त्यावर तुमची स्वाक्षरी देखील असावी. तुम्हाला हे पत्र 'केंद्रीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र', 4था मजला, सेक्टर 17, चंदीगड, पिनकोड - 160017 या पत्त्यावर वर पाठवावे लागेल.

RBI कडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. लॉकर्स असलेल्या ग्राहकांसोबत सुधारित करार करण्यासाठी बँकांना RBI ने 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचे कारण मोठ्या संख्येने लॉकरधारक अद्यापही करू शकलेले नाहीत. यापूर्वी ही अंतिम मुदत 1 जानेवारी 2023 होती.