Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Interest Subsidy Scheme मध्ये सामान्यांना खरेदी करता येणार घरे, केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना लवकरच…

Home interest subsidy scheme

केंद्र सरकार एक अशी योजना आणण्याच्या तयारीत आहे ज्यात मध्यमवर्गीय नागरिकांना परवडतील अशा व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे बँकेच्या महागड्या व्याजदरापासून देशातील लाखो मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल.

देशभरातील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. ही बातमी आहे तुमच्या स्वप्नातील घराबाबत. तुम्ही देखील घर घेण्याच्या विचार करत असाल आणि त्यासाठी बँकेचे गृहकर्जाचे दर तपासत असाल आणि त्यामुळे तुमचे आर्थिक गणित मागेपुढे होत असेल तर आता तुमची चिंता मिटलीच म्हणून समजा. याचे कारण म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासियांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना एक घोषणा केली आहे. शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणारे मध्यमवर्गीय लोक आपल्या देशात मोठ्या संख्येने राहत असून, त्यांना परवडणारी घरे खरेदी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बाबतीत न परवडणारे गृहकर्जाचे व्याजदर ही मोठी समस्या आहे हे अधोरेखित करतानाच, केंद्र सरकार लवकरच त्यांच्यासाठी नवीन योजना सुरू करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या योजनेचा लाभ घेऊन देशातील लाखो नागरिकांना त्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. केंद्र सरकार एक अशी योजना आणण्याच्या तयारीत आहे ज्यात मध्यमवर्गीय नागरिकांना परवडतील अशा व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे बँकेच्या महागड्या व्याजदरापासून देशातील लाखो मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल.

व्याज अनुदान योजना 

खरे तर ही योजना गृहकर्जावर अनुदान देण्याची आहे. पगारदार, मध्यमवर्गीयांना त्यांच्या आवडीचे, त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्याची हौस असते. त्यांना चांगला पगार देखील असतो. मात्र इतर खर्च आणि महागडे व्याजदर यामुळे बहुतांश मध्यमवर्गीय घर घेण्याचा विचार करताना मागेपुढे बघतात.

यामुळे अनेकांची घर घेण्याची स्वप्ने पूर्ण होतच नाही. या पार्श्वभूमीवर जे कर्जाची परतफेड करू शकतील आणि ज्यांची आर्थिक शिस्त देखील चांगली आहे, म्हणजेच सिबिल स्कोअर आणि इतर आर्थिक व्यवहार, अशा नागरिकांना अनुदानित गृहकर्ज देण्याची सरकारची योजना आहे.

याआधीच 2015 पासून ‘प्रधानमंत्री आवास योजना’ शहरी भागांमध्ये सुरु करण्यात आली असून. मध्यमवर्गीयांना घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 2.50 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.  

कधी येणार योजना?

प्रधानमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर मध्यमवर्गीयांनी या योजनेचे स्वागत केले आहे. या योजनेमुळे सामान्यांना कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध होणार आहेत. गृहकर्ज घेण्याची प्रक्रिया मात्र प्रत्येक बँकेची वेगवेगळी असू शकते मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अजूनही जाहीर झालेली नाही.

ही योजना कधी आणि कोणत्या राज्यांपासून सुरु केली जाईल याबद्दल सरकारकडून कुठलेही तपशील दिले गेलेले नाहीत. परंतु या वर्षाच्या अखेरीपर्यंत ही योजना सुरु करण्यात येईल असा अंदाज आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या आधीच ही योजना जाहीर केली जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.