Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Closure of Bank Account: बँकेचे खाते बंद करायचे आहे, या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Bank Account

Closure of Bank Account: अनेकजण बँक खात्यातून दरमहा कर्जाचा हप्ता (EMI) एलआयसी प्रीमियम, मोबाईल बिल, वीज बिल अदा करत असतात. ही यंत्रणा स्वयंचलित असते. ठराविक तारखेला तुमच्या बँक खात्यातून पेमेंट होते. जर बँक खाते बंद करायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी हे स्वयंचलित डेबिट थांबवणे आवश्यक आहे.

अनेकदा कामाच्या निमित्ताने बदली झाल्यास किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाल्यास ग्राहकांना बँक खाते चालू ठेवणे अवघड होते. नव्या ठिकाणी त्या बँकेची शाखा नसल्यास ग्राहकांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो.

नोकरदारांच्या बाबतीत देखील अशीच समस्या असते. नोकरीवर असताना सॅलरी अकाउंटच्या माध्यमातून व्यवहार होत असतात. नोकरी बदलली कि सॅलरी अकाउंटचा वापर कमी होतो. त्यात दरमहा जमा होणारी सॅलरी थांबली कि सॅलरी अकाउंट नोकरदारासाठी डोकेदुखी ठरु शकते. यात त्याला किमान शिल्लक ठेवावी लागते. तसे न केल्यास खातेदाराला आर्थिक भुर्दंड सोसावा लागू शकतो. अशावेळी बँक खाते बंद करणेच सोयीस्कर ठरते. मात्र खाते बंद करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.  

स्वयंचलित डेबिट होणारी रक्कम आधी थांबवा

अनेकजण बँक खात्यातून दरमहा कर्जाचा हप्ता (EMI) एलआयसी प्रीमियम, मोबाईल बिल, वीज बिल अदा करत असतात. ही यंत्रणा स्वयंचलित असते. ठराविक तारखेला तुमच्या बँक खात्यातून पेमेंट होते. जर बँक खाते बंद करायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी हे स्वयंचलित डेबिट थांबवणे आवश्यक आहे. त्याऐवजी तुम्हाला नवीन बँक खात्याचा तपशिल द्यावा लागेल. बँकेकडून सर्वसाधारणपणे आठवडाभरात बँक खाते बंद केले जाते.

अकाउंट बंद करण्याचा फॉर्म भरा

बँक खाते बंद करण्यासाठी खातेदाराला ज्या शाखेत खाते आहे त्याठिकाणी जाऊन फॉर्म भरणे आवश्यक आहे. जसा बँक खाते सुरु करण्याचा फॉर्म असतो तसाच खाते बंद करण्याचा फॉर्म असतो. तो भरुन दिला कि बँकेकडून खाते बंद करण्याची प्रोसेस सुरु केली जाते. बँक मॅनेजरला बँक खाते बंद करण्याचा फॉर्म सादर करावा लागेल. बँक खात्यात शिल्लक रक्कम असल्यास ती तुम्हाला डीमांड ड्राफ्टने मिळवता येईल. ही रक्कम 20 हजारांपेक्षा कमी असेल तर ती रोख स्वरुपात तुम्ही स्वीकारु शकता. बँक खाते बंद करताना तुमचे बँक खाते डिमॅट खात्याशी सलग्न असेल तर ते डिलिंक करणे आवश्यक आहे.  त्याऐवजी दुसऱ्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. तसेच बँक खात्याशी जोडलेले डेबिट कार्ड आणि न वापरेलेल चेक बुक क्लोजर फॉर्मबरोबर जमा करावे लागेल.

नवीन खात्याची माहिती अपडेट करा

ज्या बँक खात्यातून विविध पेमेंट जात होते अशा ठिकाणी तुम्हाला नवीन बँक खात्याची माहिती सादर करावी लागेल.  जर तुम्ही पेन्शनर आहात आणि तुम्हाला जुन्या बँक खात्याता पेन्शन मिळत असेल. तर नवीन बँक खात्याचा तपशिल सरकारकडे सादर करावा लागेल. दरमहा बँक खात्यातून पेमेंट होणाऱ्या वीज बिल आणि इतर सुविधांकडे नव्या बँक खात्याची माहिती सादर करावी लागेल.

खाते बंद करण्याच्या शुल्काची माहिती घ्या

अनेक बँकांकडून बँक खाते बंद करण्याचे शुल्क आकारले जाते. बँक खाते बंद करण्याचा नेमके शुल्क किती याबाबत योग्य माहिती घ्या. सर्वसाधारणपणे बँक खाते सुरु केल्यापासून 14 दिवसांच्या आत बंद केले तर बँकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र 14 दिवसांनंतर बँक खाते बंद करायचे असल्यास त्यावर ग्राहकांना चार्ज द्यावा लागतो. बँक खाते सुरु करणे, डेबिट कार्ड आणि चेकबुकसाठी झालेला खर्च वसुल करण्यासाठी बँका ग्राहकांवर क्लोजर चार्जेस आकारतात.