• 02 Oct, 2022 09:31

घड्याळाद्वारे FASTag स्कॅन करून पैसे लुबाडण्याचा दावा; जाणून घ्या सत्य!

घड्याळाद्वारे FASTag स्कॅन करून पैसे लुबाडण्याचा दावा; जाणून घ्या सत्य!

FasTag Scam Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फोर व्हिलर कारची काच कापडाने साफ करताना स्मार्ट घड्याळाने FASTag चा कोड स्कॅन करून स्कॅम करत असल्याची चर्चा आहे.

What is Viral Story : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका फोर व्हिलर कारची काच कापडाने साफ करताना एक मुलगा स्मार्ट घड्याळाने FASTag चा कोड स्कॅन करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. काच साफ करून तो मुलगा तिथून पळून जातो. व्हिडिओच्या शेवटी, कारचा ओनर सांगतो की, मुलाने गाडीची काच साफ करण्याच्या बहाण्याने स्मार्ट घड्याळाच्या मदतीने फास्टटॅगमधून पैसे कट केले. तर या व्हिडिओमधून FASTag मध्ये जमा असलेले पैसे कशाप्रकारे स्कॅन करून स्कॅम केला जात आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे केला जात आहे.

पण सत्य काय आहे?

व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी फास्टटॅगचे अधिकृत सोशल खाते तपासले असता, FASTag च्या खात्यावर, या व्हायरल व्हिडिओला उत्तर देण्यासाठी एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. फास्टटॅगने प्रसिद्ध केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, FASTag चा वापर हा फक्त नोंदणीकृत व्यापारी (टोल आणि पार्किंग प्लाझा ऑपरेटर) द्वारेच केला जाऊ शकतो. कोणतेही अनधिकृत उपकरण NETC च्या FASTag वर स्कॅनिंग करून व्यवहार करू शकत नाही. FASTag पूर्णपणे सुरक्षित आहे.

पेटीएमचे स्पष्टीकरण

पेटीएमने हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत म्हटले आहे की, व्हिडिओमध्ये पेटीएम फास्टॅगबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. NETC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, FASTag पेमेंट फक्त नोंदणीकृत व्यापारीच करू शकतात. अनेकवेळा त्याची चाचणी ही घेण्यात आली आहे. पेटीएम फास्टॅग पूर्णपणे सुरक्षित आहे.

दरम्यान, याबाबत आतापर्यंत या व्हिडिओच्या सत्यतेबाबत कोणाताही पुरावा आढळलेला नाही. तसेच FASTag नेही अशाप्रकारे लोकांची फसवणूक होणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. FASTag पूर्णपणे सुरक्षित आहे.