Best Investment: आजकाल तरूणाई मोठया प्रमाणात पैसा कमवित आहे. मात्र तरूणांनो तुमच्या भविष्यासाठी पैशांचे योग्य नियोजन करायचे असेल, तर आम्ही तुम्हाला तुमच्या पैशांची कुठे गुंतवणूक करायची याबाबत माहिती सांगणार आहोत. यातील एका पर्यायाची निवड करा व आपल्या भविष्याच्या सुरक्षतितेसाठी पैशांची बचत ही गुंतवणूकीच्या स्वरूपात करा. अचानक कधी ही पैशांची गरज पडल्यास तुम्हाला कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही. जसे की, नोकरीवरून काढले, अपघात झाला. यामुळे आम्ही जे गुंतवणूकीचे पर्याय सांगितले आहेत, येथे तुमचा पैसा दुप्पट होणार आहे. त्यामुळे पर्याय निवडा व पैसा दुप्पट करा.
Table of contents [Show]
पीपीएफ (PPF)
पीपीएफ (PF) म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा एका गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. येथे गुंतवणूक केल्यास यामध्ये दर वर्षाला 7.1 टक्के दराने व्याज मिळते. त्यामुळे तुमच्यासाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. तसेच पीएफ या योजनेव्दारे पैसे दुप्पट होण्यासाठी 10.14 वर्षे लागण्याची शक्यता आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificate)
एनएससी (NSC) म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक लहान बचत योजना आहे. या योजनेत तुम्ही हजार रूपये किंवा त्यापेक्षा कमी पैशांची गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला 6.8 टक्के व्याज मिळते. त्यामुळे कमी पगारावर असणाऱ्या रोजगारांसाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. या एनएससी योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 10.58 वर्षांत पैसे दुप्पट होऊ शकतात.
बँक एफडी (Bank FD)
सध्या अनेक बॅंकांनी FD च्या व्याज दरात वाढ केली आहे. कारण नुकतेच RBI ने आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे हे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला सध्याच्या एफडीवर 6 टक्के व्याज मिळणार. या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यास कमीत कमी 12 वर्षाचा कालावधी लागू शकतो.
नॅशनल पेन्शन स्कीम (National Pension Scheme)
नॅशनल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला खाते सुरू करावे लागणार आहे. हे खाते फक्त सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारीच सुरू करु शकतात. या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी साधारण 7.2 वर्षांचा अवधी लागतो.