Urfi Javed Vs Chitra Wagh Cat Fight: सोशलमिडीयावर ऊर्फी जावेद (Urfi Javed) ही कायम चर्चेत असते. ती आपल्या अंतरंगी कपडयांमुळे अनेकवेळा ट्रोलदेखील झाली आहे. मात्र ऊर्फीवर त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. आता तर थेट भाजप महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तिच्याशी पंगा घेतला आहे. सोशल मिडीयावर अंगप्रदर्शन केल्यामुळे, तिच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच ऊर्फी ही सोशल मिडीयावर चित्रा वाघ यांना प्रतिउत्तर देतानादेखील दिसत आहे. या दोघींमध्ये सोशल मिडीयावर चांगलाच वाद सुरू आहे. ती सोशल मिडीयावर जितकी प्रसिध्द आहे, तितकीच ती संपत्तीत ही कुणाच्या मागे नाही. ती महिन्याला लाखो रू. कमवत आहे. तिच्या कमाईबाबत जाणून घेऊयात.
ऊर्फी जावेदचे बालपण
ऊर्फी ही मूळची उत्तर प्रदेश राज्यातील असून लखनऊ हे तिचे गाव आहे. 15 ऑक्टोबर 1997 रोजी तिचा जन्म झाला असून, ती अवघ्या 25 वर्षाची आहे. लहानपणीच आई-वडिलांचा घटस्फोट झाल्या कारणाने, ती बालपणीच मुंबई शहरात आली. तिला दोन बहिणी आहेत. कुटुंबासोबत तिचे नाते व्यवस्थित नसल्याचेदेखील तिने एका मुलाखतीत सांगितले.
शिक्षण व करियर
ऊर्फीकडे मास कम्युनिकेशची पदवी आहे. खरं तर ती बिग बाॅस ओटीटी या रियालिटी शो च्या माध्यमातून प्रसिध्दीझातोत आली असल्याचे पाहायला मिळाले. तसेच ती ‘बडे भैय्या की दुल्हनिया’ या मालिकेतदेखील दिसली. ही मालिका 2016 मध्ये आली होती. याव्यतिरिक्त ती ‘मेरी दुर्गा’ या शो च्या माध्यमातूदेखील लोकप्रिय झाली. ‘बेपनाह’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसोटी जिंदगी की’ या नामांकित मालिकेतदेखील तिने अभिनय केला आहे.
ऊर्फी जावेदची कमाई
ऊर्फी जावेदचे वय जरी 25 असले, तरी ती इतक्या लहान वयात कोटयावधी संपत्तीची मालकीण आहे. ती दर महिन्याला लाखो रूपये कमविते. ऊर्फी मालिकेच्या एका एपिसोडसाठी जवळजवळ 25 ते 30 हजार रूपये मानधन आकारते. इन्स्ट्राग्रामवर तिचे 4 मिलियन फॉलोवर्स आहेत. ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाखो रूपयांची कमाई करते. दर महिन्याला ती 30 लाख रूपयांची कमाई करते. तिच्याकडे एकूण संपत्ती 172 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.