Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Children's Day 2022 : मुलांना सेव्हिंग अकाउंट गिफ्ट करा , 'या' बँका देतात विशेष बँक खात्याची सुविधा

Children's Day 2022, Child Saving Account, Kids Saving Account

Children's Day 2022 : लहानपणापासूनच मुलांना पैसे बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत त्यांचे सेव्हिंग अकाउंट उघडणे हा उत्तम पर्याय आहे. Children's Day च्या निमित्ताने लहान मुलांना भरपूर भेटवस्तू दिल्या जातात. या वर्षी बालदिनानिमित्त तुम्ही तुमच्या मुलांचे (पाल्यांना) सेव्हिंग अकाउंट सुरु करुन त्यांना बचतीची सवय लावू शकता.

देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर रोजी बालदिन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवसाच्या निमित्ताने लहान मुलांना भरपूर भेटवस्तू दिल्या जातात. या वर्षी बालदिनानिमित्त तुम्ही तुमच्या मुलांना (पाल्यांना) सेव्हिंग अकाउंटची भेट देऊ शकता. (Children's Day 2022 , banks offering saving account for minors)

लहानपणापासूनच मुलांना पैसे बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत त्यांचे सेव्हिंग अकाउंट उघडणे हा उत्तम पर्याय आहे. 18 वयाखालील  लहान मुलांसाठी बँक 2 प्रकारचे बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) (saving account for children) प्रोव्हाइड करते. त्यानुसार 10 वर्षांखालील मुलांसाठी सेव्हिंग अकाउंट आणि 10 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सेव्हिंग अकाउंट. 10 वर्षांखालील मुलांचे सेव्हिंग अकाउंट त्यांच्या पाल्यांसोबत जॉईन्टली सुरु करता येते. तर 10 ते 18 वयोगटातील मुले बँकेत स्वतःचे सेव्हिंग अकाउंट चालवू शकतात. मूल प्रौढ झाल्यावरच म्हणजे 18 वर्षांचे झाले की बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) कार्यान्वित होते. साधे पेपरवर्क पूर्ण केल्यानंतर या खात्याचे रुपांतर नियमित बचत खात्यात होते. त्यामुळे पालकांना यापुढे मुलांचे बचत खाते (Child Saving Account) खाते चालवता येत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीएफसी फर्स्ट बँक इत्यादी अनेक महत्वाच्या बँका मुलांसाठी विशेष बचत खाते ऑफर करतात.

‘एसबीआय’चे 'पहली उडान' आणि 'पहला कदम' (SBI Pehla Kadam & SBI Pehli Udaan)

स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असते. या बँकेतर्फे लहान मुलांसाठी 'पहला कदम' आणि 'पहली उडान' नावाची बचत खाती सेवा पुरवण्यात येते. याद्वारे मुलांना मनी मॅनेजमेंटचे महत्त्व समजण्यास मदत होते. 'पहला कदम' च्या बचत खात्या अंतर्गत पालकांना आपल्या सोबत आपल्या लहान मुलांचे जॉईंट अकाउंट सुरु करता येते. तर 'पहली उडान' अंतर्गत लहान मुले आपले अकाउंट स्वतः चालवू शकतात.

एचडीएफसी बँकेचं किड्स ऍडव्हान्टेज अकाउंट  (HDFC Kids Advantage Account )

एचडीएफसी बँक लहान मुलांसाठी एचडीएफसी बँक किड्स अॅडव्हान्टेज खाते ऑफर करते. या खात्यामुळे मुलांना पैसे व्यवस्थापनाची सवय लावण्यास मदत होते. दरमहा 1000 रुपयांपर्यंतची बचत या खात्यात केली जाऊ शकते. एटीएम-कम डेबिट कार्ड, इन्शुरन्सची सुविधा असे अनेक फायदे या खात्यामध्ये मुलांना  मिळतात. एचडीएफसी किड्स अॅडव्हान्टेज खाते उघडण्यासाठी पालक/पालकांकडे एचडीएफसी बचत बँक खाते असणे आवश्यक आहे.

आयसीआयसीआय बँकेचे यंग स्टार्स खाते (Young Stars Account/Kids Savings Account)

भारतातील एक अग्रगण्य खासगी बँक म्हणून आयसीआयसीआय बँक ओळखली जाते. आयसीआयसीआय बँकेच्या यंग स्टार्स खात्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे सुलभ जाते. या खात्यांतर्गत लहान मुलांना  मनी मल्टिप्लायर सुविधा मिळते. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या रकमेवर जास्त व्याज मिळवू शकता. फक्त एक निश्चित मर्यादा निश्चित केल्यास यंग स्टार्स खात्यातील पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर होतात.  

बँक ऑफ बडोद्याचं चॅम्प अकाउंट (Baroda Champ Savings Account)

आपल्या पाल्याला लहानपणापासूनच बचतीची सवय लागण्यासाठी तुम्ही तुमच्या पाल्याचे बँक ऑफ बडोद्याचं चॅम्प अकाउंट उघडू शकता. या खात्यासाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

एक्सिस बँकेचे फ्युचर स्टार सेव्हिंग अकाउंट

एक्सिस बँक लहान मुलांसाठी फ्युचर स्टार सेव्हिंग अकाउंट ची सुविधा उपलब्ध करून देतं. हे खाते उघडल्यास 10 वर्षांवरील मुलांना डेबिट कार्डची सुविधा मिळते.