आयटी कंपनी विप्रोचे (Wipro) चेअरमन आणि देशातील आघाडीचे उद्योगपती अझीम प्रेमजी (Azim Premji) हे संपत्तीच्या बाबतीत जगातील पहिल्या 100 श्रीमंतांच्या यादीत नसले तरी देणगीदारांच्या यादीत त्यांचे स्थान खूप वरचे आहे. 9.2 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीचे मालक अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी समाजसेवी संस्थांना 1125 कोटी रुपयांची देणगी देण्याचे जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच अझीम प्रेमजी यांनी आपली 16 अब्ज डॉलर्सची संपत्ती धर्मादाय संस्थेला दिली आहे. या देणगीमुळे मागील वर्षी ते भारतातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरून 18 व्या क्रमांकावर घसरले होते. अझीम प्रेमजींनी दान केलेली संपत्ती त्यांच्या एकूण संपत्तीच्या 75 टक्के इतकी होती. भारतीय टेक मॅग्नेट अझीम प्रेमजी यांची $10.4 अब्ज महसूल असलेली विप्रो ही भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर सेवा प्रदात्यांपैकी एक कंपनी आहे.
Hashim Premji is an Indian businessman and philanthropist, who was the chairman of Wipro Limited. Premji remains a non-executive member of the board and founder chairman. He is informally known as the Czar of the Indian IT Industry. #AzimPremji #numberone #numberoneacademy pic.twitter.com/Son1xeKJZg
— NumberOne Academy (@number1academy) February 15, 2023
प्रेमजींनी 1966 मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित व्यवसाय हाती घेतला. त्यांचे वडील खाद्यतेलाचा व्यवसाय करत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर व्यवसायात लक्ष घालण्यासाठी त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शिक्षण सोडले आणि भारतात परतले. पुढे याच वडिलोपार्जित व्यवसायासोबत त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये देखील आपला जम बसवला. विप्रोचे सिलिकॉन व्हॅलीमध्ये (Silicon Valley) एक इनोव्हेशन सेंटर आहे, जे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर आणि स्टार्टअप्ससोबत सहयोग करण्यावर लक्ष केंद्रित करते. जुलै 2019 मध्ये, प्रेमजींचा मुलगा रिषद, विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्याच्या वडिलांच्या जागेवर आला आहे.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 11 अब्ज डॉलरवरून 0.12 टक्क्यांनी घटून 9.2 अब्ज डॉलरवर आली आहे. संपत्तीच्या आकड्यातील या घसरणीचे कारण म्हणजे अझीम प्रेमजींनी केलेले प्रचंड दान. 1966 मध्ये अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून वयाच्या 21 व्या वर्षी परतलेले अझीम प्रेमजी गेल्या 33 वर्षांपासून विप्रोला पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून परतलेल्या अझीम प्रेमजीची एक रंजक गोष्टही आहे. खरे तर वडील मुहम्मद हाशिम प्रेमजी यांच्या निधनामुळे त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या 21 व्या वर्षी व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात परतावे लागले होते, परंतु कालांतराने वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.अझीम प्रेमजी हे सध्या बंगळुरू येथे वास्तव्यास असून त्यांचे राहते घर 6,000 स्क्वेअर फुटांचे असून त्यांच्या बंगल्याची किंमत 350 कोटी रुपये इतकी आहे.
भारताच्या आयटी उद्योगात मोलाचे योगदान देणाऱ्या अझीम प्रेमजी यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 1966 मध्ये भारतात परतल्यानंतर, प्रेमजी विप्रो यांनी त्यांच्या वडिलांच्या कंपनी, वेस्टर्न इंडियन व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेडचा साबण आणि भाजीपाला व्यवसाय हाती घेतला, ज्याने सूर्यफूल वनस्पति ब्रँड अंतर्गत खाद्यतेल आणि कपडे धुण्याचे साबण तयार केले होते. या कंपनीचे नाव नंतर ‘विप्रो’ असे करण्यात आले. अझीम प्रेमजी यांनी 1980 च्या दशकात आयटी क्षेत्रात दिसत असलेल्या शक्यता लक्षात घेऊन विप्रोची स्थापना केली.
नाही तर पाकिस्तानात असली असती विप्रो कंपनी...
ज्या अझीम प्रेमजींवर आणि विप्रो कंपनीवर भारतीयांना गर्व आहे, ती कंपनी आणि प्रेमजी परिवाराला पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले गेले होते. भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर देशातील शिक्षित, उद्योगपती मुसलमान नागरिकांना पाकिस्तानात येण्याची विनंती मुस्लिम लीगने केली होती.अझीमजींच्या वडिलांना, मुहम्मद हाशिम प्रेमजी यांना खुद्द पाकिस्तानचे जनक मुहम्मद अली जिन्हा यांनी पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले होते.सोबतच नव्या पाकिस्तानात मोठे पद देखील दिले जाईल असे आश्वासन देखील दिले होते. जर जिन्हांचे निमंत्रण अझीमजींच्या वडिलांनी धुकडावून लावले नसते तर आज विप्रो कंपनी आणि प्रेमजी परिवार पाकिस्तानात असले असते.
“मी एक हिंदुस्थानी आहे आणि मी भारतातच राहणे पसंत करेल”, अशा शब्दांत मुहम्मद हाशिम प्रेमजींनी मुहम्मद अली जिन्हांची ऑफर धुडकावली होती. मूळचे गुजरातमधील कच्छ येथील रहिवासी असलेले मुहम्मद हाशिम हे 'राईस किंग ऑफ बर्मा' म्हणून ओळखले जात. विप्रोचा विस्तार आता 65 देशांमध्ये आहे. इतर उद्योगपतींच्या तुलनेत प्रेमजी वेगळे ठरतात ते त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे. अझीम प्रेमजी यांनी 'अझीम प्रेमजी फाउंडेशन' नावाने एक एनजीओ स्थापन केला आहे. या एनजीओला त्यांनी विप्रोचे 66% शेयर दिले आहेत.