गेल्या काही वर्षांपासून सोने हे चलनवाढीविरूद्ध एक परिपूर्ण बचतीची गुंतवणूक म्हणून सामान्य लोक खरेदी करताना दिसत आहेत. सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्या आमच्या वाचकांसाठी माहितीच्या उद्देशाने भारतातील सोन्या-चांदीचे काय भाव आहेत ते आम्ही येथे देत आहोत.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात छोटे-मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचे भाव अतिशय कमी दराने कमी-जास्त होत आहेत. सामान्य नागरिकांना याचा म्हणावा तितका विशेष फायदा होणार नाहीये. खरे सांगायचे झाल्यास सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या 15 वर्षांत, सोन्याने 366% परतावा दिला आहे. जो शेअर बाजारापेक्षा 179% अधिक आणि FD पेक्षा 164% अधिक आहे. 2020-21 मध्ये जगभरातील अर्थव्यवस्थांना कोरोनाचा मोठा फटका बसला होता. प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे अनेक गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. औद्योगिक उत्पादन थांबले असल्याकारणाने या काळात सोन्यातील गुंतवणूक वाढली होती. 2022 मध्ये बाजार पुन्हा खुले झाल्यामुळे सोन्या-चांदीची मागणी वाढली आहे. सोबतच जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम आता दिसू लागले आहेत.जगभरात महागाई वाढली आहे, याचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर पाहायला मिळतो आहे. संभाव्य महागाई आणि मंदी लक्षात घेता सोने खरेदीसाठी लोकांनी सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळते आहे. त्यामुळे साहजिकच सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
2023 मध्येही सोने 10% पेक्षा जास्त परतावा देईल असे तज्ञांचे मत आहे. सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 63 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. कालच्या तुलनेत सोन्याचे भाव वाढलेले नाहीत. 22 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 52,650 इतका नोंदवला गेला आहे. तसेच 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 57,440 इतका आहे. चांदीच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली असून, 1 किलो चांदीसाठी ग्राहकांना 72,400 रुपये मोजावे लागणार आहेत. काल चांदीचे भाव 72,200 इतके होते. चांदीच्या भावात 200 रुपयांनी वाढ झालेली आहे.