Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSME Industry: सूक्ष्म आणि मध्यम गटातील उद्योगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने उचलले पाऊल

MSME Industry

Image Source : www.indiafilings.com

MSME Industry: देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुमारे 11 कोटी रोजगार पुरवतात. तर सकल राष्ट्रीय उत्पादनात MSME क्षेत्राचा 30% वाटा असून निर्यातीतील उत्पन्नात या क्षेत्राचा 50% वाटा आहे

भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 'मेक इन इंडिया' चा नारा दिल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये स्टार्टअप सुरू झाले. मोठ्या उद्योगांबरोबच सूक्ष्म, लघु आणि मध्यम (MSME) उद्योग हे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या एमएसएमई क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न उचलत आहे. "भारताचा विकास साधत असताना MSME क्षेत्राला अधिक बळकटी दिली जाईल, असे लघु उद्योग राज्यमंत्री भानूप्रताप सिंग वर्मा म्हणाले.  

देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुमारे 11 कोटी रोजगार पुरवतात. तर सकल राष्ट्रीय उत्पादनात MSME क्षेत्राचा 30% वाटा असून निर्यातीतील उत्पन्नात या क्षेत्राचा 50% वाटा आहे, असे FICCI च्या वार्षिक संमेलनामध्ये बोलताना वर्मा म्हणाले.  

निर्मिती आणि सेवा क्षेत्रात सुमारे 1 लाख नवे उद्योग सुरु (One Lakh New Job's)

2021-22 वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात 1 लाख नवे युनिट्स सुरू करण्यात आले. यामुळे रोजगार निर्मितीमध्ये मदत झाली. MSME उद्योग उभारताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरुणांमध्ये उद्योजकतेला वाव देण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या उद्योगांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे वर्मा म्हणाले.

देशभर टेक्नॉलॉजी सेंटर उभारण्यास सुरुवात (Technology Center's in India)

MSME क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योग आणि भविष्यात सुरू होणाऱ्या उद्योगांसाठी देशभर टेक्नॉलॉजी सेंटर उभारण्यात येतील. उद्योगांना तंत्रज्ञान सुधारणा आणि गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी 'ZED' प्रमाणपत्र मिळण्यास सुलभता येण्यासाठी इतर संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. गुणवत्ता, नाविन्य आणि डिझाइनमध्ये सुधारणा करण्यासाठी ASPIRE ही योजना सुरू करण्यात आली आहे. 
MSME क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आर्थिक मदत आणि तंत्रज्ञान हे कळीचे असल्याचे MSME मंत्रालयाचे सचिव सिवान म्हणाले. उद्योगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत मिळून काम करत आहे. 2020 साली सुरू केलेल्या 'सेल्फ रिलायंट इंडिया' फंडद्वारे 125 कंपन्यांना 2 हजार 335 कोटी भांडवल उभे करण्यास मदत झाली, असे सिवान यांनी म्हटले.

MSME च्या अडचणी सोडविण्यासाठी चँपियन पोर्टल

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने चँपियन हे पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे सर्व MSME उद्योगांना एकाच छताखाली सुविधा मिळतील. पोर्टलसाठी इथ क्लिक करु शकता. https://champions.gov.in/Government-India/Ministry-MSME-Portal-handholding/msme-problem-complaint-welcome.htm 

पोर्टलद्वारे काय सुविधा मिळणार 

  • अर्थ सहाय्य, कामगार, परवानग्या आणि कच्चा माल मिळण्यास मदत. 
  • निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील नवनवीन संधी मिळवण्यासाठी सहाय्य
  • सर्वोत्तम MSME कंपन्यांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्यास मदत