सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने मुंबईत तब्बल 46200 स्क्वेअर फूटची जागा खरेदी केली आहे. मुंबईतील मॅरेथॉन फ्युचरेक्स या इमारतील सीडीएसएलने 163.16 कोटी खर्च करुन दोन कार्यालयांसाठी जागा खरेदी केली आहे. यासाठी 9.79 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.
या डिलनुसार सीडीएसएलने 35 व्या मजल्यावर 23110 चौरस फूट जागा खरेदी केली आहे. यात एकूण जागेचा कारपेट एरिया 23100 स्क्वेअर फूट इतका आहे. यात कंपनीला 16 कार पार्किंग स्लॉल्टस मिळाले आहेत. 14 नोव्हेंबर 2022 रोजी याची नोंदणी झाली.
सीडीएसएलने याच इमारतीत 34 व्या मजल्यावर 23110 चौरस फूट जागा खरेदी केली आहे. यासाठी कंपनीने 81.52 कोटींचे अॅग्रीमेंट बनवले आहे. या व्यवहारात 4.89 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मध्य मुंबईतील लोअर परेल हा भाग बिझनेस हब म्हणून विकसित होत आहे. येथे कमर्शिअल प्रॉपर्टीचा भाव प्रती चौरस फूट कारपेट एरियानुसार 35300 रुपयांच्या आसपास आहे. यापूर्वी याच इमारतीत कन्साई नेरोलॅक या कंपनीने 23500 चौरस फूट जागा खरेदी केली होती. हे डिल 85 कोटींमध्ये पूर्ण झाले होते. अभिनेते राकेश रोशन यांच्या फ्लिमक्राफ्ट या प्रोडक्शन हाऊसने येथे 33 कोटी खर्च करुन 10000 चौरस फूट जागा खरेदी केली होती.