SBI बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी CBI कडून व्यायवसायिक प्रमोद गोयंका व त्याची कंपनी यश ज्वेलर्सच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद गोयंका यांनी SBI ची 405 कोटीची फसवणूक केली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी प्रमोद गोयंका हे 2018 पासून मिसिंग आहेत. पाहुयात कोण आहेत हे प्रमोद गोयंका व नेमकं प्रकरण काय आहे.
Table of contents [Show]
काय आहे प्रकरण?
प्रमोद गोयंका यांनी त्यांच्या यश ज्वेलर्स कंपनीसाठी SBI कडून 235 कोटी रूपयांचं कर्ज खोट्या कागदपत्राच्या साहय्याने मंजूर करून घेतलं. त्यानंतर 2014 साली त्यांनी आपलं खातं नॉन परफॉर्मिग असेट दाखवून कर्जाची परतफेड केली नाही. यामुळे SBI बँकेचं 405 कोटी रूपयाचं नुकसान झालं आहे.
या प्रकरणी SBI ने प्रमोद गोयंका यांच्यासह रूस्तम अरीझ टाटा व अनंत एल प्रभुदेसाई यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल केली आहे.
SBI ने आपल्या तक्रारीमध्ये काय म्हटलं आहे?
SBI प्रमोद गोयंका व त्यांच्या अन्य दोन साथीदारांवर बँकेची फसवणूक करून कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीमध्ये SBI ने प्रमोद गोयंका यांच्या व्यवहारा विषयी काही गोष्टी नमुद केल्या आहेत. जसे की, 2007 साली प्रमोद गोयंका यांच्या यश ज्वेलर्स कंपनीने स्पेशल पर्पझ वेहिकल अंतर्गत म्हणजे कंपनीला आर्थिक जोखमीपासून लांब ठेवण्यासाठी गोयंका यांनी यांनी ज्वेल अमेरिकाचे 51 टक्के शेअर्स घेतलेले. तसेच गोयंका यांच्याकडे डिबी रियॅलिटीचे सुद्धा शेअर्स असण्याची शक्यता एसबीआय बँकेने आपल्या तक्रारीच्या माध्यमातून वर्तवली आहे.
कोण प्रमोद गोयंका आहेत?
प्रमोद गोयंका हे डीबी रियॅलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद गोयंका यांचे छोटे बंधु आहेत. प्रमोद गोयंका यांनी कुटुंबाचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय सोडून 2007 साली स्वत:चा ज्वेलरी व्यवसाय सुरू केला आहे. यश ज्वेलर्स असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे.
या कंपनीमध्ये न्यूयॉर्क येथील अॅडीन इंटरनॅशनल या कंपनीच्या साहय्याने प्रमोद गोयंका यांनी हा व्यवसाय उभा केलेला. यामध्ये अॅडीन इंटरनॅशनल कंपनीचे 40 टक्के इक्विटी शेअर्स होते. मात्र, 2008 मध्ये कंपनीच्या प्रवर्तकाकडून हे शेअर्स खरेदी केले गेले आहेत.
2018 पासून गोयंका आहेत मिसिंग
दरम्यान, या घटनेतील आरोपी प्रमोद गोयंका हे फेब्रुवारी 2018 पासून मिसिंग आहेत. 17 फेब्रुवारी 2018 रोजी गोयंका हे साऊथ इस्टर्न आफ्रिका येथे व्यवसायाच्या कारणास्तव एका गुजराती व्यापाराशी भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर गोयंका यांच्याशी काहिच कॉन्टॅक होऊ शकलेला नाहीये. यानंतर प्रमोद गोयंका यांचे मोठे बंधू विनोद गोयंका यांनी जुहू पोलिस स्थानकात यासंदर्भात तक्रार नोंदवत परराष्ट्र मंत्रालयात सुद्धा याबाबत कळविले. परराष्ट्र मंत्रालयाकडून तपास करण्यात आला. मात्र, प्रमोद गोयंका यांच्याविषयी काहिच माहिती मिळू शकली नाहीये.