1 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2022 या दरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 1.14 लाख कोटींचा टॅक्स रिफंड दिला आहे. एकूण 1.97 कोटी करदात्यांना टॅक्स रिफंड देण्यात आल्याचे CBDT ने म्हटलं आहे. कर परताव्याबाबत CBDT ने ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यात 1.97 कोटी करदात्यांना कर परतावा देण्यत आला आहे. त्यापैकी 1,99,00,998 प्रकरणांमध्ये 61,252 कोटींचा रिफंड वितरित करण्यात आला आहे. 1,46,871 कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये 53,158 कोटींचा परतावा देण्यात आला असल्याचे कर मंडळाने म्हटलं आहे.
अद्याप रिफंड मिळाला नसेल तर तुम्ही रिफंड स्टेटस असा चेक करु शकता.
- www.incometax.gov.in या वेबसाईटवर जा आणि लॉग इन करा
- लॉगिनसाठी पॅन क्रमांक किंवा आधार नंबर आणि पासवर्ड टाका.
- यानंतर 'e-file' option वर क्लिक करा.
- 'e-file'मध्ये Income Tax Return हा पर्याय निवडा.
- यामध्ये फाईल्ड रिटर्न्सला वर क्लिक करा.
- लेटेस्ट ITR वर क्लिक करा आणि रिफंडचा स्टेटस बघा.
उशिराने आयटीआर भरण्यासाठी दंड लागणार!
दरम्यान, 31 जुलै 2022 नंतर टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तब्बल पाच महिन्यांचा अर्थात 31 डिसेंबर, 2022 पर्यंत अतिरिक्त कालावधी मिळणार आहे.यासाठी करदात्यांना विलंब शुल्क आणि देय कर रकमेवर दरमहा दंड म्हणून व्याज भरावे (ITR due date penalty) लागणार आहे. त्याशिवाय आयटीआर का उशिरा भरला याबाबत विचारणा करणारी एखादी नोटीस सुद्धा तुम्हाला येण्याची शक्यता आहे. वार्षिक 5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या टॅक्सपेअर्सला 31 जुलै नंतर आयटीआर भरल्यास इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. वार्षिक 5 लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार.