Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Loan EMI Calculator

कर्जाची रक्कम
व्याज दर किती टक्के?
%
कर्जाचा कालावधी
Yr
मासिक EMI
कर्जाची रक्कम
किती व्याज मिळाले
एकूण मूल्य

 

महामनी Car Loan EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला कशी मदत करेल?


तुम्ही कुठल्याही प्रकारचं कर्ज घेतल्यावर त्या कर्जाचं एक खातं वित्तीय संस्थेकडे तयार होतं. आणि अशा कर्ज खात्यांमध्ये देशात दरवर्षी सरासरी 28% नी वाढ होत आहे. म्हणजेच कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. आतापर्यंत देशात जवळ जवळ 120 दशलक्ष कर्ज खाती आहेत.

कार किंवा वाहन कर्ज हे वैयक्तिक कर्जाच्या अंतर्गत येतं. त्याची मुदत साधारणपणे तीन ते आठ वर्षं इतकी असते. आणि व्याजदर इतर वैयक्तिक कर्जांच्या मानाने जास्त असतो. तुम्ही कर्जावर विकत घेतलेली गाडी कर्जाच्या वेळी तुम्हाला तारण ठेवावी लागते.

 

वाहन कर्जाच्या नियोजनात EMI कॅल्क्युलेटरची मोठी मदत होऊ शकते.


नेमकेपणाने EMI समजतो - तुम्हाला नेमक्या किती कर्जाची गरज आहे हे तपासून बघितल्यावर तुमच्यापुढे महत्त्वाचा प्रश्न असतो कर्जाची परतफेड शक्य आहे का? म्हणजे EMI दर महिन्याला भरणं शक्य आहे का? आणि त्यासाठी महामनी EMI कॅल्क्युलेटर तुमच्यासमोर कर्जाची रक्कम, त्यावर लागणारं एकूण व्याज आणि परतफेडीसाठी जाणारी एकूण रक्कम यांच्याबरोबरच ही रक्कम फेडण्यासाठी महिन्याला तुम्हाला भरायचा EMI अशी माहिती एका फटक्यात सांगतो.


त्यामुळे EMI चा अंदाज तुम्हाला येतोच. शिवाय मासिक पगार आणि कर्जाच्या हफ्त्याचं गुणोत्तरही समजतं. या गुणोत्तरावर तुम्हाला कर्ज मिळणार की नाही हे ठरतं. म्हणूनच तज्ज्ञ असा सल्ला देतात की, मासिक हातात येणाऱ्या पगाराच्या 50% च्यावर EMI असू नये.


वेळ वाचवतो - एरवी कर्जाचं गणित समजून घेणं क्लिष्टही आहे आणि वेळखाऊही. पण, त्यासाठी आता तुम्हाला बँकेच्या कर्मचाऱ्यावर अवलंबून राहायला नको. आणि बँकेत भेटही द्यायला नको. घरी बसून EMI चा अंदाज घेऊ शकता. आणि कर्जाच्या नियोजनाची तयारीही करू शकता.

अचूकता - महामनी EMI कॅल्क्युलेटर अचूक आहे. यंत्राच्या मदतीने केलेलं गणित चुकत नाही. त्यामुळे तुम्हाला नेमका अंदाज येतो.


वापरायला सोपा - महामनी EMI कॅल्क्युलेटर वापरायलाही सोपा आहे. फक्त तीन आकडे भरून तुम्ही EMI, कर्जाची रक्कम आणि कर्जाचा कालावधी यांचा अंदाज घेऊ शकता.


महामनी Car Loan EMI कॅल्क्युलेटरसाठी गणिती सूत्र


तुमचा EMI एका गणिती सूत्रावरून ठरत असतो. ते समजून घेऊया.


EMI = [P x R x (1+R) ^N]/ [(1+R) ^ (N-1)]


इथं, P - मुद्दल

R - व्याजदर

N - कर्जाची मुदत


महामनी Car Loan EMI कॅल्क्युलेटर कसा वापराल?

 

प्रत्येक घटकाखाली दिलेली निळी रेषा हलवून तुम्ही नेमका आकडा निवडू शकता. किंवा चौकटीत तुमचा आकडा लिहा

Step 1 : कर्जाची एकूण रक्कम लिहा  

Step 2 : कर्जावरील व्याजदर लिहा  

Step 3 : कर्जाचा एकूण कालावधी  


या तीन गोष्टी कॅल्क्युलेटरमध्ये भरल्यात की, तुमच्यासमोर तुमचा महिन्याचा EMI, कर्जावरील एकूण व्याज आणि मुद्दल अधिक व्याज अशी तुम्ही बँकेला करायची एकूण परतफेड असे सगळे आकडे समोर येतील.

महामनी Car Loan EMI कॅल्क्युलेटर वापरायला सोपाही आहे आणि ही सेवा ऑनलाईन मोफत उपलब्ध आहे.

https://mahamoney.com/how-to-decide-car-budget

https://mahamoney.com/wha-happens-if-the-car-loan-emi-is-missed-find-out

 

संबंधित कॅल्क्युलेटर
Home Loan EMI  Calculator
EMI Calculator
Bike Loan EMI Calculator
Personal Loan EMI Calculator
महामनीचे इतर कॅल्क्युलेटर
PPF Calculator
NPS - National Pension Scheme 
SIP - Mutual Funds Calculator
Lumsum - Mutual Funds Calculator
EPF - Calculator