FD Investment Post Retirement Plan : कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेवर आकर्षक व्याजदर देत आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिक आणि अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी 444 दिवसांच्या विशेष FD योजनेवर सर्वाधिक व्याजदर जाहीर केला आहे.
जर तुम्ही निवृत्त होण्याचा विचार करीत आहात किंवा काहीच दिवसाने निवृत्त होणार असाल, तर कॅनरा बँकेची 444 दिवसांची विशेष एफडी योजना तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकते. या पैशांच्या माध्यमातून निवृत्त झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करु शकता.
Table of contents [Show]
गेल्या दोन महिन्यांपासून अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना जाहीर करीत आहे. परंतु, कॅनरा बँकेने निवृत्ती नंतरचा प्लॅन सादर करुन ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक समस्या सोडविण्यास मदत केली आहे.
15 लाख ते 2 कोटींपर्यंत गुंतवणूक
कॅनरा बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर नियमित ग्राहक, ज्येष्ठ नागरिक किंवा अति ज्येष्ठ नागरिक यावर अवलंबून असतो. नागरिकांनी केलेली मुदत ठेव खरोखरच दिलेल्या अटींची पूर्तता करीत आहे की नाही, यानुसार एफडी वरील व्याजदर बदलू शकतात. गुंतवणूकीची किमान रक्कम 15 लाख आणि कमाल 2 कोटी रुपयांपर्यंत निश्चित केली जाते.
444 दिवसांची विशेष एफडी योजना
कॅनरा बँक 444 दिवसांच्या कालावधीसह अत्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी (80 वर्षांवरील) विशेष ठेव योजनेवर वार्षिक 8% दराने सर्वोच्च व्याज दर देत आहे. बँकेच्या मते, या FD योजनेवर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी (80 वर्षे आणि त्याहून अधिक) 0.60% अतिरिक्त व्याजदर दिला जात आहे. कॅनरा बँकेच्या 444 विशेष एफडी योजनेसह आर्थिक सुरक्षितता वाढविण्यास गुंतवणूकदारांना 8% पर्यंत व्याज दिले जात आहे.
कॅनरा बँक गुंतवणूकदारांसाठी 444 दिवसांची विशेष एफडी ऑफर करत आहे. म्हणजेच या विशेष एफडीमध्ये ग्राहकांना मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा निवडणे किंवा न निवडण्याचा पर्याय दिला जात आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार,मुदतपूर्तीनंतर पैसे काढल्यास 8% व्याज दर दिला जाईल आणि मुदतीपूर्वी पैसे काढल्यास 7.85% व्याज दर दिला जाईल.
ज्येष्ठ नागरिकांनी मुदतपूर्व पैसे काढल्यास
कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदतपूर्व पैसे काढण्याच्या पर्यायासह FD वर 4 ते 7.75% च्या दरम्यान व्याज दर ऑफर करते. त्याचवेळी, बँकेने 444 दिवसांच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.75% व्याज दर देऊ केला आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी मुदतपूर्ती नंतर पैसे काढल्यास
कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदतपूर्व पैसे काढण्याच्या पर्यायाशिवाय FD वर 5.30 ते 7.90% दरम्यान व्याज दर ऑफर करते. बँक 444 दिवसांच्या कालावधीत सर्वाधिक 7.90% व्याज दर देत आहे.
अति ज्येष्ठ नागरिकांनी मुदतपूर्ती नंतर पैसे काढल्यास
कॅनरा बँक अत्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदतपूर्व पैसे काढण्याच्या सुविधेशिवाय FD वर 5.40 ते 8% पर्यंतचे व्याज दर देते. बँक अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांच्या FD वर सर्वाधिक 8% व्याजदर देत आहे.