Inactive Account Rules: कोरोनामुळे(Covid 19)प्रत्येकाच्या जीवन शैलीत अनेक बदल घडून आले. अनेक बाबी अशा आहेत ज्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली. कोरोना काळामध्ये सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक अकाऊंट अनिवार्य होते, त्यामुळे आता जवळपास प्रत्येकाचे बँक खाते आहे. त्याचबरोबर आर्थिक गरजा (Financial needs) व्यवस्थापित करण्यासाठी बँक खाते आवश्यक आहे. पण काही वेळा बँक अकाऊंट बंद (Inactive Account Rules) केल्या जाते, त्यामध्ये सलग दोन वर्ष व्यवहार न झाल्याने बँके कडून बँक खाते बंद करण्यात येते. त्यात काही शिल्लक असेल तर ती रक्कम खाते बंद झाल्यानंतरही काढता येऊ शकते का? याबाबत माहित करून घेऊया.
खाते कधी निष्क्रिय होते? (When does an account become inactive?)
जर एखाद्या व्यक्तीने खात्यात दोन वर्षे कोणत्याही प्रकारचे व्यवहार (transactions) केले नसतील तर अशा परिस्थितीत ते खाते निष्क्रिय केले जाते. हे खाते FD, RD, चालू खाते, बचत खाते इत्यादी कोणत्याही प्रकारचे खाते असू शकते. दुसरीकडे, एखादे खाते सलग 8 वर्षे निष्क्रिय राहिल्यास, त्याची रक्कम दावा न केलेली रक्कम मानून ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये (Education and Awareness Fund) ट्रान्सफर केली जाते.
केवायसीद्वारे पैसे काढा (Withdraw through KYC)
तुमचे बँकेत खाते असल्यास, काही आवश्यक कागदपत्रे (Documents) करून तुम्ही बँकेतून पैसे काढू शकता. त्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. परंतु जर तुम्ही खातेधारकाचे नॉमिनी असाल आणि तो खातेदार आता नसेल, तर तुम्हाला त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रासह केवायसी (KYC with Death Certificate) करावे लागेल. यानंतर तुम्ही बंद झालेल्या बँक खात्यातून पैसे काढू शकाल.
बँकेशी संपर्क साधावा लागेल (You have to contact the bank)
जर तुमचे एखादे बँक खाते बंद झाले असेल आणि तुम्हाला त्यात पडलेले पैसे काढायचे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला त्या खात्याची माहिती काढावी लागेल. बँकेत तुम्हाला त्या खात्याची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील कागदपत्रे उपयोगी पडतील,
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (PAN card)
- जन्मतारीख (date of birth)
- पत्ता (address)
यानंतर, तुम्ही बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आणि काही आवश्यक कागदपत्रांद्वारे तुमचे पैसे काढू शकता.