PM Kisan Latest News: पीएम किसान समृध्दी योजना (PM Kisan Yojana) ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावे या हेतूने 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत देशातील कित्येक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसेदेखील जमा होतात. मात्र या पीएम किसान योजनेच्या लाभ प्रत्यक्षात पती-पत्नी असे दोघे ही घेऊ शकतात का? तसेच कोणाला या योजनेतून वगळण्यात आले आहे, या सर्व गोष्टी जाणून घेवुयात.
पती-पत्नी घेवु शकतात का लाभ? (Can Husband & Wife Avail the Benefit)
पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रूपये जमा होतात. ही रक्कम 2000 रूपयांनुसार टप्प्या- टप्प्याने जमा होते. हा हप्ता दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र या योजनेचा लाभ पती-पत्नी असे एकत्रित घेवु शकत नाही. कारण शेतजमीन ज्या व्यक्तीच्या नावावर असेल, त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नियमानुसार पती-पत्नी एकाच जमिनीवर एकत्रित या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
कोणाला या योजनेतून वगळले? (Who is Excluded From this Scheme)
- जर शेतकरी कुटुंबातील एखादा सदस्य करची रक्कम भरत असेल, तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची जमिन नाही असे शेतकरी या योजनेतून वगळण्यात आले आहेत.
- शेतजमीन आहे, पण ती इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही.
- जर एखादा शेतकरी सरकारी नोकरी करत असेल, तर त्याला पीएम किसान योजनेचा फायदा होणार नाही.
- नोंदणीकृत डॉक्टर, अभियंता, वकील, सीए यांनादेखील या योजनेतून काढण्यात आले आहेत.
- कोणत्याही शेतकऱ्याला वार्षिक 10000 रुपये पेन्शन मिळत असेल, तर त्याला पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
ई-केवायसी आवश्यक (E-KYC Required)
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी विना पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही.