• 07 Dec, 2022 07:50

SIP: दररोज 100 रुपयाची बचत करून उभा करू शकता लाखोंचा निधी

Mutual Fund SIP, Mutual Fund, SIP

SIP: आजची छोटी बचत उद्याचे तुमचे मोठे स्वप्न पूर्ण करू शकते, दररोज थोडी बचत करून तुम्ही लाखोंचा निधी उभा करू शकता. तो कसा ते जाणून घ्या या लेखातून.

Mutual funds: कोरोना व्हायरसमुळे (Corona virus) जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थाही (Indian Economy) त्यातून सुटली नाही. बचत खाते आणि एफडी (Fixed Deposit) वर मिळणारे व्याज खूप कमी झाले आहे. कमी व्याजदरामुळे बँक बचत योजना फारशा आकर्षक राहिलेल्या नाहीत. अशात जर तुम्हाला कमी पैशात जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. उज्ज्वल भविष्याची तयारी करायची असेल तर छोटी बचत दररोज करून लाखाचा निधी जमा होऊ शकतो, तो कसा ते जाणून घ्या. 

दररोज 100 रुपये वाचवले तर 15 वर्षांनी 20 लाख रुपये मिळतील…

आपण तज्ज्ञ व्यक्तीकडून नेहमी ऐकतो की, रोज थोडी बचत करा (Small Savings) आणि ती योग्य ठिकाणी गुंतवा. जर तुम्ही दररोज फक्त 100 रुपये इतकी छोटी रक्कम जमा केली तर तुम्ही 20 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. म्युच्युअल फंड तुम्हाला या कामात अधिक चांगली मदत करू शकतात. आजकाल रोजगाराच्या संधी मर्यादित झाल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशात  तुम्ही दिवसाला 100 रुपये वाचवलेत तर ते महिन्याला 3,000 रुपये होईल. तुम्ही हे रुपये 3,000 दरमहा एका चांगल्या म्युच्युअल फंड योजनेच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये टाकू शकता. तुम्हाला ही गुंतवणूक सलग 15 वर्षे करावी लागेल, आता असे अनेक म्युच्युअल फंड (Mutual funds) आहेत, ज्यांनी गेल्या 15 वर्षांत दरवर्षी 15% दराने परतावा दिला आहे. जर तुम्हाला इतका परतावा मिळत राहिला तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 20 लाख रुपयांचा निधी जमा झाला असेल.

अशा प्रकारे तुमचे पैसे वाढतील

जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दरमहा 3,000 रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक 15 वर्षे चालू राहिली तर 15 वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक 5.40 लाख रुपये होईल. जर तुमच्या फंड मॅनेजरची कामगिरी चांगली असेल, तर १५ वर्षांनंतर तुमच्या एसआयपीचे एकूण मूल्य २० लाख रुपये होईल, म्हणजेच 14.60 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक 

म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास, काही चांगल्या योजनांनी १५ वर्षांत १५% पर्यंत परतावा दिला आहे.  गुंतवणूकदारांनी त्यांचा संपूर्ण निधी कोणत्याही एका फंडात ठेवू नये. तुम्ही दरमहा रु. 3,000 गुंतवत असाल, तर प्रत्येकी रु. 1,000 चे तीन भाग करा आणि तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता.  त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे लाभ मिळतील आणि तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या बळकट होऊ शकते.