Buying Gold In Cash: गोल्ड खरेदी करायचा प्लॅन करत असाल तर गोल्ड खरेदीविषयी कायदा काय म्हणतोय हे माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर गोल्ड खरेदी करायला गेल्यावर तुमचा हिरमोड होऊ शकतो. कारण, इन्कम टॅक्स कायद्यानुसार तुम्ही कॅशमध्ये गोल्ड खरेदी करत असल्यास किती रकमेच गोल्ड घेता याला कोणतेही बंधन नाही. मात्र, सोनाराला एका ठरावीक रकमेच्यावर कॅश स्वरुपात पैसे स्वीकारण्यावर बंधन आहे. चला तर ते काय आहे जाणून घेऊया.
सोनारावर आहे निर्बंध
गोल्ड खरेदी करायचं म्हटल्यावर मुख्यता सण किंवा काही महत्वाच्या प्रसंगी गोल्ड खरेदीला जास्त प्राधान्य दिले जाते. तसेच, आता मार्केटमध्ये गोल्ड खरेदी करायचे विविध प्रकार आले तरी शाॅपमध्ये जाऊन गोल्ड खरेदी करायची मजा काही औरच आहे. मात्र, इन्कम टॅक्स कायद्यानुसार एकाच व्यवहारासाठी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम कॅश स्वरुपात स्वीकारण्यास सोनाराला निर्बंध आहेत.
त्यामुळे कितीही रकमेच सोन खरेदी करता येत असले तरी त्याची विक्री करताना प्रत्येक एका व्यवहारासाठी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम स्वीकारण्यास कायद्याने मनाई केली आहे. त्यामुळे सोनाराला या नियमानुसारच विक्री करायची आहे. तसे न केल्यास दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कॅश रक्कम स्वीकारल्यास इन्कम टॅक्स विभाग कायद्यानुसार तरतुदीचे उल्लंघन केल्यामुळे स्वीकारलेल्या रकमे एवढा दंड आकारू शकते.
दोन लाखांच्यावर पॅन कार्ड आवश्यक
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जर महत्वाच्या प्रसंगी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच सोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला विक्रेत्याला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून द्यावा लागणार आहे. पण, दोन लाखांपेक्षा कमी किमतीसाठी तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्डची गरज लागणार नाही. त्यामुळे तुम्ही दोन लाखाच्या आत सहज कॅशमध्ये गोल्ड खरेदी करु शकणार आहात.
डिजिटल गोल्डमध्ये आहे फायदा
तुम्ही महत्वाच्या प्रसंगांसाठी जसे की, मुलांच्या लग्नासाठी सोने घ्यायचा विचार करत असाल तर तज्ज्ञांच्यानुसार तुम्हाला सॉवरेन गोल्ड बाॅण्डमध्ये (SGB) गुंतवणूक करणे फायद्याचे ठरु शकते. यामुळे तुम्हाला चांगला रिटर्न मिळण्यास मदत होते. कारण, याच्या इश्यू प्राईसवर तुम्हाला दरवर्षी 2.50 टक्के व्याज मिळते. तसेच तुम्ही जेव्हा ते रिडीम करता, तेव्हा त्यावर कोणताही कॅपिटल गेन भरावा लागत नाही.
तसेच, डिजिटली खरेदी करत असल्यामुळे यावर तुम्हाला जीएसटी किंवा मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही. याचा ही तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मुलांच्या लग्नाच्या वेळी प्रत्यक्ष सोने खरेदी करताना तुम्हाला जीएसटी भरावा लागू शकतो. पण, यादरम्यान तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्यावर व्याजही मिळवता येते. तसेच, तुम्ही सॉवरेन गोल्ड बाॅण्डमध्ये वैयक्तिक 4 किलोपर्यंत सोन खरेदी करु शकता.