सणासुदीचे दिवस आता येतील. श्रावण सुरु झाला की आपल्याकडे वेगवेगळे सण-समारंभ आणि त्याच्या निमित्ताने होणारी खरेदीची लगबग सुरु होते. घर सजावटीसाठी महत्वाची खरेदी असते ती बेडशीटची. कारण बेडशीटमुळे तुमच्या घराला एक वेगळाच फील येत असतो.
सध्या बेडशीटच्या किमती देखील प्रचंड ,महागल्या आहेत. चांगल्या गुणवत्तेचे, पोट असलेले आणि प्रिंट असलेले डबल बेडशीट 1500 ते 2000 रुपयांना मिळते. तर सिंगल बेडशीटच्या बाबतीत हाच रेट 1000 ते 1200 रुपयांच्या दरम्यान आहे.
काही वर्षांपूर्वी 400-500 रुपयांना मिळणारे हे बेडशीट अचानक कसे महाग झाले? असा प्रश्न तुम्हांला पडलाच असेल. याचे मुख्य कारण आहे, होम डेकोरची वाढती क्रेझ. तुम्ही इन्स्टाग्रामवर होम डेकोरचे अनेक रील्स बघितले असतील. घर सजावटीबाबत सध्या लोक कमालीचे सक्रीय झालेले आपल्याला आढळतात. नेमकी हीच बाब ओळखून अनेक क्लोथिंग कंपन्यांनी बेडशीट व्यवसायात चांगलीच आघाडी घेतलेली पाहायला मिळते आहे.
असो, बेडशीटचे वेगवेगळे डिजाईन, प्रकार सध्या उपलब्ध असल्याने आणि मागणी अधिक असल्याने त्याच्या किमती वाढताना दिसतायेत, चला तर जाणून घेऊयात अशा एकाही टिप्स ज्यामुळे तुम्ही तुमचे घर सुंदर सजवू शकता आणि बेडशीट खरेदी करताना पैसे देखील वाचवू शकता …
Table of contents [Show]
गुणवत्ता महत्वाची
बेडशीट खरेदी सुरू करण्यापूर्वी तुम्ही आधी वाजवी बजेट ठरवले पाहिजे. यामुळे तुम्हाला तुमचे पर्याय कमी करण्यात आणि जास्त खर्च टाळण्यास मदत होईल. आधी तुमच्याकडे बेडशीटचे किती कलेक्शन आहे हे देखील तपासा. गरज असेल तरच खरेदी करा अन्यथा खरेदी टाळली तरी काही हरकत नाही.
टिकाऊ आणि आरामदायी असलेल्या लिनन आणि कॉटनच्या, चांगल्या दर्जाच्या बेडशीटच खरेदी करा.अशा बेडशीट महाग वाटू शकतात मात्र त्या दीर्घकाळ चालतात हे मात्र विसरू नका.
ऑफर्सवर लक्ष ठेवा
मान्सून सेल, समर सेल, सण-समारंभ आदी निमित्ताने दुकानदार घर सजावटीच्या वस्तूंवर सलवत देत असतात. अशा ऑफर्सवर लक्ष ठेवा. या ऑफर्समध्ये तुम्ही चांगली डील मिळवू शकता आणि कमी पैशात चांगली वस्तू घरी घेऊन जाऊ शकता. बेडशीटचे मटेरियल आधी चेक करा , त्याचे स्पेसिफिकेशन वाचा आणि मगच ऑर्डर करा.
ऑनलाइन मार्केटप्लेसवर देखील काही ऑफर्स सुरु असतात, त्या देखील तपासा. मात्र ऑनलाइन खरेदी करताना जरा सांभाळून! ‘जसं दिसतं तसं नसतं’ हे सूत्र लक्षात ठेवा.
आउटलेट स्टोअर्स आणि क्लिअरन्स सेल
कमी किमतीत गेल्या हंगामातील डिझाइनसाठी आउटलेट स्टोअर्स किंवा किरकोळ विक्रेत्यांचे क्लिअरन्स सेल आयोजित केले जातात. तुम्हाला त्यांच्या मूळ किमतीच्या कमी किमतीत उच्च-गुणवत्तेच्या बेडशीट खरेदी करता येऊ शकतील. Ddecor, Athome, Hometown सारखे नावाजलेले ब्रांड देखील क्लिअरन्स सेल आयोजित करत असतात. यात खरेदी करून तुम्ही 50-60 टक्केपर्यंत पर्यंत पैसे वाचवू शकता.
खरेदी करण्यापूर्वी, विविध ब्रँड आणि स्टोअरमधील किमती आणि स्पेसिफिकेशनची तुलना जरूर करा. ऑनलाइन प्लॅटफॉर्म ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनवतात, त्यामुळे ऑनलाइन किमती चेक करत राहा.
ऑफ-सीझन खरेदी
मागणी कमी असताना ऑफ-सीझनमध्ये बेडशीट खरेदी करा. या काळात किमती कमी असतात कारण किरकोळ विक्रेते नवीन डिझाईन्स बाजारात आणण्यासाठी क्लिअरन्स सेल आयोजित करत असतात. दिवाळी-दसरा या सणांच्या निमित्ताने नवीन माल बाजारात येतो, मात्र त्याच्या किमती परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे ऑफ-सीझन खरेदी हा बचतीचा चांगला मार्ग आहे.
बेडशीटची काळजी घ्या!
तुम्ही जर लिनन, कॉटनच्या बेडशीट खरेदी करणार असाल तर त्यासाठी मेंटेनन्स अधिक लागतो हे लक्षात ठेवा. हे बेडशीट वेळोवेळी धुणे, वाळवणे, त्यासाठी स्वतंत्र डिटर्जंट वापरणे, गरम पाण्याने न धुणे अशी सगळी पथ्ये पाळावी लागतात. ही पथ्ये पाळली तरच तुमचे बेडशीट दीर्घकाळ चालणार आहे. नाही तर महागडे बेडशीट खरेदी करून त्याची निगा राखली नाही तर तुमचे पैसे वाया जावू शकतात.
यासाठी वॉशिंग सूचनांचे अनुसरण करा आणि बेडशीटची काळजी घ्या. बेडशीट खरेदी करतांना तुमची प्राधान्ये आणि गरजा स्पष्टपणे समजून घेऊन पैशांची बचत करण्याच्या या टिप्स तुम्ही वापरू शकता.