Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: स्नॅक्स विकून महिन्याला किती पैसे कमवू शकता?

Business Idea

Image Source : https://www.freepik.com/

खाद्यपदार्थांच्या विक्रीतून दरमहिन्याला 30 ते 35 हजार रुपयांची कमाई करणे सहज शक्य आहे. कमी गुंतवणुकीसह हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

स्नॅक्स विक्रीचा व्यवसाय सुरू करावा का? यातून खरचं कमाई होईल का? असा प्रश्न पडतो. अनेकजण वडापाव, समोसा, इडली, पोहे सारखे खाद्यपदार्थाच्या विक्रीतून दरमहिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. 

हैदराबाद येथील रामेश्वर कॅफे तर कॉफी, चहा आणि स्नॅक्सच्या विक्रीतून महिन्याला 5 कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे. गेल्याकाही वर्षात केवळ रामेश्वर कॅफेच नाही तर येवले अमृततुल्यपासून एमबीए चायवाल्यापर्यंत चहा व स्ट्रीट फूडची विक्री करणारे अनेक व्यवसायिक ब्रँड्स लोकप्रिय झाले आहेत.   

तुम्ही देखील कमी गुंतवणुकीत स्वतःचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करताना या गोष्टी ठेवा लक्षात ठेवायला हव्यात व यातून महिन्याला किती कमाई होऊ शकते? याविषयी जाणून घेऊया.

खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू करताना या गोष्टी ठेवा लक्षात

योग्य जागेची करा निवडकोणत्याही व्यवसायाच्या यशामध्ये जागेची भूमिका खूप महत्त्वाची असते. तुम्ही कोणत्या भागामध्ये व्यवसाय सुरू करत आहात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही जर खाद्यपदार्थ विक्रीसाठी जास्त रहदारी असलेल्या, कॉलेज-शाळा असलेल्या भागात व्यवसाय सुरू करणे कधीही फायद्याचे ठरते. याशिवाय, स्ट्रीट फूड पार्कमध्ये देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल.
व्यवसायासाठी आवश्यक वस्तू व सामान व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेली भांडी असणे गरजेचे आहे. तुम्हाला व्यवसायासाठी गॅसपासून कडई, ग्लास, झारे इत्यादी भांडी खरेदी करावी लागतील. तसेच, पदार्थ बनविण्यासाठी आवश्यक असलेले सामान देखील खरेदी करावे लागेल. मात्र, हे सामान एकदाच न आणता गरजेनुसार खरेदी करावे. 
स्वतः पदार्थ बनवायला शिकास्वतःच्या व्यवयातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला येणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पदार्थ बनविण्यासाठी इतरांची नेमणूक करत असाल तरीही स्वतः वडापाव, पोहे, इडली असे विविध पदार्थ बनविण्यास शिकायला हवे. याचा पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. 
गुणवत्ता व स्वच्छता कोणताही व्यवसाय हा तेथील खाद्यपदार्थांच्या चवीवरून ओळखला जातो. त्यामुळे तुमचे पदार्थ सर्वोत्तम असतील व ग्राहकांना आवडतील याची काळजी घ्या. तसेच, व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता असणे देखील गरजेचे आहे.
व्यवसाय परवाना खाद्य पदार्थांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक परवाना असणे गरजेचे आहे. तुम्ही रस्त्यावर स्वतःचा स्टॉल सुरू करत असा अथवा हॉटेल सुरू करणार आहात, तुमच्याकडे परवाना असणे आवश्यक आहे. तुम्ही महानगरपालिका अथवा संबंधित अधिकाऱ्याकडून व्यवसायासाठी परवाना घेऊ शकता.

महिन्याला किती कमाई करू शकता? कोट आणि अंदाजे आकडेवारी

कधीही कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करणे हा स्मार्ट निर्णय मानला जातो. व्यवसायात यश मिळू लागल्यानंतर गुंतवणूक वाढवू शकता. खाद्यपदार्थाच्या व्यवसायातून महिन्याला तुम्ही अगदी 20 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता.

गेली 5 वर्ष झाली खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या दिनेश यांनी सांगितले की, महिन्याला किती व्यवसाय होईल हे ग्राहकांवर अवलंबून असते. अनेकदा महिन्याला 30 ते 35 हजार रुपयांची कमाई होते. तर काही महिन्यात 60 हजार रुपयांपर्यंत देखील कमाई झाली आहे.

दिनेश यांच्या सारखेच शेकडो व्यवसायिक खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या माध्यमातून महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहे. त्यामुळे तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच चांगला निर्णय ठरू शकतो. यातून महिन्याला कमीत कमी 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमाई करणे शक्य आहे.