Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Affordable Homes: नव्या फ्लॅटच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; परवडणारी घरं फक्त 20 टक्के

Affordable homes

Image Source : www.hcorealestates.com

कोरोनानंतर बांधकाम क्षेत्राने उभारी घेतली आहे. मात्र, महागाईने गृहप्रकल्प उभा करण्यासाठी विकासकांना येणाऱ्या खर्चातही वाढ झाली आहे. 40 लाख रुपयांच्या आतील म्हणजेच परवडणाऱ्या घरांची निर्मिती रोडावल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. बिल्डरकडून आलिशान गृहनिर्मिती प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न धूसर होत आहे

Affordable Homes in India: महागाईचा परिणाम अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रावर होत आहे. भाववाढीचा परिणाम बांधकाम क्षेत्रावरही झाला आहे. देशातील प्रमुख शहरांतील जमिनीचे भाव वाढले आहेत. सोबतच सिमेंट, स्टीलसह बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गृहप्रकल्प निर्मितीचा खर्चही वाढत आहे. बांधकाम व्यवसायिकांकडून परवडणाऱ्या सदनिका बांधण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 40 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची घरे बांधण्याकडे विकासकांचा कल आहे.

40 लाख रुपयांखालील घरांची निर्मिती रोडावली

अनरॉक या प्रॉपर्टी कन्सलटंट कंपनीने देशातील परवडणाऱ्या घरांबाबत अहवाल तयार केला आहे. त्यातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. या अहवालात कमी किंमतीची म्हणजेच परवडणाऱ्या घरांची किंमत 40 लाख रुपयांच्या खाली मानण्यात आली आहे. ही रक्कमही 1 BHK घर घेऊ इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी जास्त असू शकते. 40 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची घरे बांधण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल नाही. (Affordable Homes in India) कारण, अशा घरांमध्ये बिल्डरचे मार्जिन कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्या तुलनेत चाळीस लाख ते दीड कोटी या दरम्यान किंमती असणाऱ्या सदनिकांमध्ये व्यावसायिकांचे मार्जिन जास्त आहे. त्यामुळे अशीच घरे बांधण्याकडे बिल्डर्सचा कल असल्याचे अहवालात म्हटले आहे.

खालील तक्त्यात देशातील प्रमुख 7 शहरांतील तयार झालेल्या एकूण घरांची आकडेवारी देण्यात आली आहे. 

वर्षएकूण घरांची संख्यापरवडणाऱ्या घरांची टक्केवारी
20181,95,30040%
20192,36,56040%
20201,27,96030%
20212,36,70026%
20223,57,65020%

सोर्स - अनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट

2018 सालातील आकडेवारी काय सांगते

2018 साली देशात जेवढे गृहप्रकल्प उभे राहिले त्यापैकी 40% घरे ही अॅफोर्डेबल (परवडणाऱ्या) श्रेणीतील होती. मात्र, हे प्रमाण 2018 नंतर कमी होत गेले. 2022 साली देशातील एकूण तयार घरांपैकी फक्त 20% घरे ही परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीतील आहेत, असे अनरॉकने म्हटले आहे. 

निर्मिती खर्च वाढण्यामागील कारण काय?

कोरोनानंतर बांधकाम क्षेत्राने उभारी घेतली आहे. मात्र, अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांमध्ये भाववाढ पाहायला मिळत आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे विकासकांनीही घरांच्या किंमती वाढवल्या आहेत. तसेच 40 लाखांच्या आतील घरांमध्ये बिल्डरला जास्त परवडत नाही. तर आलिशान आणि हायएंड गृहप्रकल्पात बिल्डरला जास्त परवडते. त्यामुळे अफॉर्डेबल हाऊसिंग प्रकल्प तुलनेने कमी उभे राहत आहेत. गृह प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी अनेक वेळा बिल्डर्सकडून निकृष्ट दर्जाचा कच्चा मालही वापरण्यात आल्याचे मागील काही दिवसांत समोर आले आहे. त्यामुळे या मालाची गुणवत्ता तपासण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.