Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2024: घरखर्चाचे आर्थिक नियोजन करायचे आहे? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास होईल खर्च कमी अन् बचत जास्त

Budget 2024

Image Source : https://www.freepik.com/

केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले जाणार आहे. या बजेटमध्ये काही महत्त्वाच्या घोषणा सरकारकडून केल्या जाऊ शकतात. बजेटमधील घोषणांचा तुमच्या आर्थिक नियोजनावर देखील परिणाम होऊ शकतो.

केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे अखेरचे बजेट असल्याने सरकारकडून फारमोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारच्या काही घोषणांचा परिणाम तुमच्या आर्थिक नियोजनावर देखील होऊ शकतो. 

या बजेटमध्ये नवीन कररचनेबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, उद्योग-धंद्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात. याशिवाय, सर्वसामान्यांसाठी देखील सरकार काही विशेष योजना आणण्याची शक्यता आहे. देशाच्या अंतरिम बजेटच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरातील आर्थिक बजेट कशाप्रकारे हाताळू शकता, तसेच, खर्च कमी करून बचत जास्त होईल यासाठी काय करायला हवे? याविषयी जाणून घेऊया.

‘या’ टिप्स फॉलो केल्यास होईल खर्च कमी अन् बचत जास्त

घरखर्चाची करा मांडणीउत्पन्नातील सर्वाधिक खर्च हा घरातील गोष्टींवर होतो. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच दरमहिन्याला घरात लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार करणे गरजेचे आहे. किराणा सामान, औषधे, टीव्ही-मोबाइल बिल्स, वीज बिल अशा विविध खर्चांची मांडणी करणे गरजेचे आहे. यामुळे अनावश्यक असलेला खर्च कमी करण्यास मदत होईल. 
कर्ज कमी करण्यावर भर द्या

नियमितपणे घराचे, गाडीच्या कर्जाचे हफ्ते भरत असाल तर कर्जाची रक्कम कमी होत नाहीये, असे कधी वाटले आहे का ? यामागचे कारण म्हणजे तुम्ही केवळ कर्जाचे हफ्ते भरताय, कर्जाची मुद्दल रक्कम कमी करत नाहीये. 

सर्वातआधी क्रेडिट कार्ड, गृहकर्ज, वाहन कर्ज अशा विविध कर्जांपैकी ज्याची रक्कम कमी आहे, त्याची पूर्ण परतफेड करा. यामुळे तुम्हाला एकाच कर्जाचे जास्त रक्कमेसह हफ्ते भरता येतील. याशिवाय, तुमच्याकडे पैसे जमा झाले असल्यास हफ्त्यांव्यतिरिक्त ही रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरू शकता. यामुळे कर्जाच्या हफ्तांच्या संख्या कमी होईल. 

उद्देश ठरवून करा गुंतवणूक

या वर्षाखेर घर, गाडी खरेदी करायची आहे अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा उद्देशाने गुंतवणुकीला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही एखाद्या उद्देशाने गुंतवणू करता, त्यावेळी पैशांची अधिक बचत होते.

याशिवाय, ऑटोमेटिक सेव्हिंग पद्धत वापरू शकता. यामुळे दरमहिन्याला आपोआप ठराविक रक्कम बाजूला पडेल. दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक करणे कधीही चांगले.

आपत्कालीन निधीतुम्ही जर आतापर्यंत आपत्कालीन निधीत पैसे जमा केले नसल्यास वर्ष 2024 मध्ये याची सुरुवात करू शकता. आपत्कालीन निधीमध्ये तुमचा 6 महिन्याचा खर्च पूर्ण होऊ शकतो, एवढी रक्कम जमा असणे गरजेचे आहे. मेडिकल इमर्जेंसी अथवा नोकरी गेल्यास आपत्कालीन निधीची मदत होते. त्यामुळे 2024 च्या आर्थिक नियोजनामध्ये आपत्कालीन निधीचा समावेश करायला विसरू नका. तसेच, स्वतःचा व कुटुंबाचा आरोग्य व जीवन विमा नक्की काढा.
क्रेडिट कार्डचा वापर टाळा यूपीआय व क्रेडिट कार्डच्या वापरामुळे आपण अनावश्यक गोष्टींवर प्रचंड पैसे खर्च करतो.  क्रेडिट कार्डऐवजी तुम्ही रोख रक्कम व डेबिट कार्डचा वापर खर्चासाठी करू शकता. यामुळे निश्चितच अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होईल.