अभिनेता दिलीप कुमार, अभिनेत्री मधुबाला यांची प्रमुख भूमिका असलेला मुघल-ए-आझम चित्रपट 1960 मध्ये प्रदर्शित झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood Film Industry) एक महान चित्रपट अशी या चित्रपटाची ओळख आहे. अनेक दशकांनंतरही या चित्रपटाने ऐतिहासिक चित्रपटाचा दर्जा प्राप्त केला आहे. एक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, दोन उत्तम कलाकार आणि पडद्यामागचा पाठिंबा या चित्रपटाला सुपरहिट ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी पुरेसा होता. दिलीप कुमार, मधुबाला यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला हा चित्रपट तेव्हाही हिट होता, आज आहे आणि उद्याही असेल. या चित्रपटाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत ज्या माहीत असायला हव्यात. आज आपण या चित्रपटातील आयकॉनिक गाण्याविषयी (Bollywood Songs) माहिती घेऊया.
एका गाण्यासाठी 10 लाख रुपये खर्च
मुघल-ए-आझम हा चित्रपटा कथा, अभिनय आणि गाणी या सर्वच बाबतीत हिट ठरला. या चित्रपटातील सर्वच गाणी छान होती. पण तुम्हाला माहीत आहे का त्यातील एका गाण्यावर त्याकाळी तब्बल 10 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ते गाणे आजही प्रेक्षकांच्या तोंडून गुणगुणले जाते. ते गाणे होते प्रेमाबद्दल. ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याविषयी आपण बोलत आहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाणे त्या काळात 10 लाख खर्चून तयार करण्यात आले होते. म्हणजेच त्या वेळी 10 लाखात पूर्ण चित्रपट बनत असताना हे गाणे शूट करण्यासाठी केवळ 10 लाख रुपये खर्च झाले होते.
एवढा खर्च का झाला?
मुघल-ए-आझम या चित्रपटात आपल्या भव्य सेट दिसतो. पण तुम्हाला माहीत आहे का? की ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रिकरणासाठीसुद्धा भव्य सेट तयार करण्यात आला होता. या गाण्याच्या सेटसाठी अनेक आरशांचा वापर करण्यात आला होता. यामुळेच हे हिंदी चित्रपटांतील सर्वात महागडे आणि सर्वोत्कृष्ट गाणे ठरले. दुसरीकडे संपूर्ण चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, त्यावेळी हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. सर्वांच्या मेहनतीमुळे पुढे हा चित्रपट शतकातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
चित्रपटातील गाण्यांवर होतो करोडो रुपये खर्च
मुघल-ए-आझम या चित्रपटावरुन लक्षात येते की पूर्वीपासूनच भारतीय सिनेसृष्टीत चित्रपटांच्या कथेप्रमाणेच त्यामधील गाण्यांकडेही विशेष लक्ष देण्यात येते. आजही चित्रपट हिट ठरावा म्हणून सिने निर्माते अभिनेता, अभिनेत्री यांना तगडी रक्कम ऑफर करतात. फरक फक्त एवढाच आहे की, पूर्वी यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत होते. पण आता चित्रपटातील गाण्यांवर करोडो रुपये खर्च करण्यात येतात.