Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2022 Bollywood Fail Movie: जाणून घेऊ, यावर्षी सपशेल अयशस्वी ठरलेले बॉलीवूड चित्रपट

Bollywood Flop Movies in 2022

Bollywood Flop Movies: 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक बिग-बजेट बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र काही चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात अयशस्वी ठरले. यामध्ये सुपरस्टार अक्षय कुमारपासून ते आमिर खान यांच्या चित्रपटांचादेखील समावेश आहे. यावर्षी बॉक्स ऑफिसवर सपशेल अयशस्वी ठरणारे चित्रपट कोणते आहे, याबाबत जाणून घेऊ.

 Bollywood Fail Movie: आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांबद्दल सांगत आहोत, जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार असणाऱ्या कलाकारांच्या चित्रपटांचादेखील समावेश आहे.  

हीरोपंती 2 (Heropanti 2)

हिरोपंती 2 हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित झाला. अहमद खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत, तारा सुतारिया झळकली होती. 70 करोड रूपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 35.13 करोड रूपये कमविले होते.

heropanti 2
http://indianexpress.com/

जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar)

बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला होता. हा चित्रपट एकूण 86 करोडमध्ये तयार करण्यात आला होता, मात्र 26.13 करोडच मिळविण्यात यश मिळाले.

jayeshbhai jordaar
http://www.bollywoodbubble.com/

बच्चन पांडे (Bachchan Pandey)

बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)चा हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला,परंतु हा चित्रपट प्रेक्षकांवर जादू करण्यात अयशस्वी ठरला. फरहाद सामजीचा हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास 165 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 73.17 कोटींची कमाई केली. 

bachchan pandey
http://www.quirkybyte.com/

सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) 

2022 मध्ये अक्षयकुमारचा हा दुसरा चित्रपट होता, जो फ्लॉप ठरला. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा चित्रपट 3 जून 2022 रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 150 ते 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने केवळ 90.32 कोटींची कमाई केली आहे.

Samrat Prithviraj