Crypto Price Today: क्रिप्टो मार्केटमधील महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सी 12 जानेवारीच्या सुरुवातीला प्रॉफिटमध्ये ट्रेड करत होत्या. कारण वर्ल्ड क्रिप्टो मार्केट कॅप शेवटच्या दिवशी 3.39 टक्क्यांनी वाढून 886.94 बिलियन डॉलरवर पोहोचला होता. गेल्या 24 तासात एकूण क्रिप्टो मार्केटचा व्हॉल्यूम 21.39 टक्क्यांनी वाढून 42.52 बिलियन डॉलर्स झाला आहे.
DeFi मध्ये एकूण व्हॉल्यूम सध्या 3.52 अब्ज डॉलर आहे. जो एकूण 24 तासातील क्रिप्टो मार्केटच्या एकूण व्हॉल्यूमच्या 8.28 टक्के आहे. सर्व स्टेबल कॉईन्सचे प्रमाण आता 39.20 बिलियन डॉलर्स आहे. जे एकूण क्रिप्टो मार्केटमधील व्हॉल्यूमच्या 92.19 टक्के आहे. तर Coinmarketcap अनुसार, Bitcoin या जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत 15.43 लाखांच्या आसपास असून बिटकॉईन डॉमिनन्स 39.44 टक्के आहे. ज्यात दिवसभरात 0.25 टक्क्यांनी वाढ झाली.
Table of contents [Show]
महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सीच्या आजच्या किमती
बिटकॉईन (Bitcoin)
क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या कॉईनची किंमत 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 18,217.75 युएस डॉलर एवढी होती. मागील चोवीस तासात या कॉईनच्या किमतीत 4.49 टक्क्यांची वाढ झाली. भारतीय चलनात बिटकॉईनची सध्याची किंमत 14,87,441.51 रुपये आहे.
इथेरियम (Ethereum)
इथेरियमची किंमत 1403.67 डॉलर्स असून त्यामध्ये 5.35 टक्क्यांची वाढ झाली. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या कॉईनची भारतीय चलनात 1.14 लाख इतकी किंमत आहे.
डॉजकॉईन (Dogecoin)
डॉजकॉईनची किंमत 0.0800 युएस डॉलरवर सकाळी ट्रेड करत होती. याची मागील 24 तासात 4.52 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX) भारतीय चलनात डॉजकॉईनची किंमत 6.53 रुपये आहे.
लाईटकॉईन (Litecoin)
मागील चोवीस तासात लाईटकॉनचे मूल्य 4.95 टक्क्यांनी वाढले आहे. तर याची किंमत 84.64 युएस डॉलर होती. ज्याचे भारतीय चलनात मूल्य 6,905.09 रुपये आहे.
सोलाना (Solana)
सोलाना क्रिप्टोच्या किमतीत मागील चोवीस तासात 3.04 टक्क्यांची वाढ झाली असून याची किंमत 16.44 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय चलनातील किंमत 1340.66 रुपये एवढी आहे.