Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Animal Husbandry: पशुपालकांसाठी मोठी बातमी, दुधाळ जनावर योजनेअंतर्गत गायी, म्हशींच्या खरेदी किंमतीत वाढ

Big news for the Animal Husbandry

Animal Husbandry Update: दुधाळ जनावर योजनेअंतर्गत गायी, म्हशींच्या खरेदी किंमतीत राज्य सरकारने पशुपालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात दुध उत्पादनास चालना मिळावी या हेतूने राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याच्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत असणाऱ्या प्रति दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 Big News for the Animal Husbandry: राज्यात दुध उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने खूप महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याच्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत असणाऱ्या प्रति दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

खरेदी किंमतीत किती वाढ झाली? (How much has the Purchase Price Increased)

ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता गाईसाठी 70,000 रूपये तर म्हशीसाठी 80,000 रूपये मोजावे लागणार आहे. ही योजना राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्व साधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजना) यांच्यासाठी लागू आहे. तर या योजनेतून मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळण्यात आले आहेत.

वाटप कसे करण्यात येणार आहे? (How will the Allocation be made)

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण जनजाती क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यांना फक्त 2 दुधाळ देशी किंवा संकरीत गायी किंवा म्हशींच्या गटाचे वाटप करण्यात येणार आहे.

विमा उतरविणे अनिवार्य (Insurance is Mandatory)

जे पशुपालक या योजनेचा लाभ घेणार आहे, त्यांना दोन्ही दुधाळ जनावरांच्या गटाचे वाटप एकाच वेळी केले जाईल. तसेच दुधाळ जनावरांच्या किंमतीनुसार कमाल 10.20 टक्के मर्यादेपर्यंत (अधिक 18 टक्के सेवाकर) दराने 3 वर्षांकरीता विमा उतरविणे अनिवार्य केले आहे. शासनाच्या हिश्यानुसारची रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. तसेच निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विषयावर एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रति लाभार्थी 500 रुपये देण्यात येणार आहे. तसेच या निर्णयानुसार दुधाळ जनावरांच्या किंमतीच्या प्रमाणात प्रशासकीय खर्चासाठी 1 टक्का निधी उपलब्ध करुन देण्यास मंजुरीदेखील दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी 2023-24 या वर्षापासून करण्यात येणार आहे.