Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Orchard Plantation Subsidy: आता फळबागांना मिळणार 100% अनुदान! भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरु

Fruits

Orchard Plantation Subsidy: तीन वर्षापासून बंद असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 16 बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे.

Orchard Plantation Subsidy: तीन वर्षापासून बंद असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 16 बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 75.40 हेक्टरवर फळ बागेची लागवड करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आल्याने शेतकन्यांना दिलासाही  मिळाला आहे.

असा मिळेल शेतकऱ्यांना लाभ

फळबाग लागवडीकरिता किमान 0.20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत शेतकरी इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिकांची लागवड करू शकतात. मनरेगात पात्र असणाऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी योजनेचा लाभ घेता येते. शिवाय शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांचे कलमे व रोपांची लागवड करता येईल.

आतापर्यंत अमरावती जिल्हात 75.40 हेक्टरवर फळ बागेची लागवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात 24 करणाऱ्या हेक्टर, यवतमाळ 12 हेक्टर, बुलडाणा 3310 हेक्टर, तर वाशीम जिल्ह्यात सरासरी 178 हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड झाली आहे. फळबाग लागवड शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालकांनी सांगितले. 

orange-tree-1.jpg

फळबाग योजनेत खड्डे खोदणे, कलमे व रोपांची लागवड करणे, पीक संरक्षण, तसेच ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी 100 टक्के अनुदान आहे. शेतकऱ्यांनी यासाठी स्वखर्चाने जमीन तयार करणे, आंतरमशागत, काटेरी कुंपण तसेच शेणखत, सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खत देणे हा खर्च स्वखर्चाने करावयाचा आहे.

या योजनेत आवश्यकतेनुसार व कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कलमांची किंवा रोपांची लागवड करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे विदर्भातील संत्रा, मोसंबी, आबा, कागदी लिंबू, पेरू, आवळा, सीताफळ आदी फळबाग लावणे सुलभ झाले आहे. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता 

  • लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.
  • ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. 
  • शेतकऱ्याच्या  स्वतःच्या नावावर 7/12 असणे आवश्यक आहे. 
  • 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची परमिशन  असणे आवश्यक आहे.
  • परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरुन अप्लाय करू शकता

(Source: https://mahasarkariyojana.in)