भारत पे चे (BharatPe) मूळ संस्थापक भाविक कोलाडिया यांनी अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. कोलाडिया यांनी आपले शेअर्स भारत पे चे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांच्याकडून परत मिळवण्यासाठी ही कायदेशीर लढाई सुरू केली. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती प्रतिक जालान यांच्यासमोर हे प्रकरण नोंदवण्यात आले. कोलाडिया आणि ग्रोव्हर यांच्यात शेअर्सवरून वाद झाल्याची चर्चा सर्वप्रथम गेल्यावर्षी समोर आली होती. या प्रकरणातील प्रतिवादींमध्ये भारत पे चाही समावेश आहे.
संस्थापक म्हणून कोलाडिया आणि शाश्वत नाक्राणी, जे त्यावेळी IIT-दिल्ली येथे शिकत होते. त्यांनी जुलै 2017 मध्ये BharatPe ची स्थापना केली. कोलाडिया हे त्यावेळी कंपनीचा चेहरा होते. त्यामुळे फंड्स मिळवण्यासाठी कोलाडिया नेहमी पुढे असत. तीन महिन्यानंतर जून, 2018 मध्ये ग्रोव्हर कंपनीमध्ये तिसरे सह-संस्थापक म्हणून सामील झाले होते.
जेव्हा ग्रोव्हर भारत पे कंपनीत सामील झाले, तेव्हा कंपनीतील शेअर होल्डिंगमध्ये ग्रोव्हर यांचा वाटा 32%, नाक्राणी यांचा वाटा 25.5% आणि कोलाडियाकडे 42.5% स्टेकसह कंपनीतील सर्वात मोठे शेअर राहिला, जो अजूनही कायम आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या फायलिंगनुसार, कोलाडिया 2007 मध्ये यूएसला गेले होते. तिथे ते ग्रोसरी मार्ट चालवत होते. त्यात त्यांनी सरकारच्या परवानगीशिवाय डिजिटल पद्धतीने पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात केली होती. यामुळे अमेरिकेतील आयडेंटिटी थेफ्ट आणि मेल फसवणूक कायद्याचे उल्लंघन झाल्यामुळे त्यात त्यांना अटक होऊन तुरुंगवास भोगावा लागला. 22 महिने चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर, त्यांना 100 डॉलरचा दंड आकारून सोडण्यात आले. त्यानंतर ते 2015 मध्ये भारतात परत आले. कोलोडिया यांना यूएस सारख्या देशात अटक होऊन तुरुंगवास भोगावा लागला. ही गोष्ट अनेक मोठमोठ्या गुंतवणूकदारांना पचनी पडत नव्हती. ज्यामुळे कोलोडिया यांचे नाव कंपनीला संस्थापकांच्या यादीतून काढावे लागले. 2018 मध्ये Sequoia गुंतवणूकदार म्हणून बोर्डावर येण्यापूर्वी ही घटना घडली आणि तेव्हापासून ग्रोव्हर कंपनीचा चेहरा बनले. त्यानंतर कोलाडिया हे 'सल्लागार' म्हणून भारत पे ची टेकनिकल बाजू सांभाळू लागले.
दरम्यान, इतर संस्थापक आणि शेअर होल्डर्सनी कंपनीमधील कोलाडिया यांचा सहभाग कमी करण्यासाठी एक निर्णय घेतला. या दरम्यान कोलाडियाने आपला हिस्सा ग्रोव्हर, नाक्राणी, नाक्राणीचे वडील आणि काही एंजल इन्वेस्टर्सना हस्तांतरित केले. पण असे असले तरी कोलाडिया यांच्याकडे अजूनही सर्वात मोठा शेअरहोल्डर आहे. कारण त्यांच्याकडे अजूनही कंपनीचा जवळपास 57.5 टक्के हिस्सा आहे. ग्रोव्हरच्या नावावर असलेल्या 81 टक्क्यांमधील 35 टक्के हिस्सा हा कोलाडियाचा आहे; तर नाक्राणी यांच्याकडे कोलाडियाचा 22.5 टक्के हिस्सा होता.
सध्या कोलाडिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ग्रोव्हर यांच्याकडून त्यांचे शेअर्स परत मिळवण्यासाठी दावा दाखल केला आहे. ग्रोव्हर यांच्याकडे कोलाडिया यांचे 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स आहेत. BharatPe ने 2021 मध्ये 285 बिलियन डॉलर्सच्या व्हॅल्युऐशनने शेवटचे फंड उभारले होते. ग्रोव्हर आणि भारत पे यांच्यातील बोर्डरूम लढाई संपल्यानंतर तसेच ग्रोव्हर बाहेर पडल्यानंतर लगेचच कोलाडिया ग्रोव्हर विरोधात त्यांचे शेअर्स परत मिळवण्यासाठी कायदेशी कारवाई करणार होते. यामध्ये कोलाडिया यांना इतर शेअरहोल्डर्सचा पाठिंबा देखील मिळाला होता. परंतु दिल्ली कोर्टात जाण्याच्या एक आठवडाआधी कोलाडिया आणि ग्रोव्हर यांच्यात सेटलमेंटसंबंधी चर्चा सुरु होती. पण ती कदाचित फिस्कटल्यामुळे कोलाडिया यांनी ग्रोव्हर यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.