Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Power In Your Pocket: 'या' खास अ‍ॅपसह करा पैशांचे मॅनेजमेंट अन् राहा नो टेन्शन!

Power In Your Pocket: 'या' खास अ‍ॅपसह करा पैशांचे मॅनेजमेंट अन् राहा नो टेन्शन!

आता पैसे ट्रान्सफर करण्यापासून पैसे काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. मग आपला होणारा खर्च का डिजिटल होऊ नये? आज आम्ही तुमच्यासाठी काही अ‍ॅप्स घेऊन आलो आहोत. जे तुमच्या सर्व खर्चांचा हिशोब डिटेलमध्ये ठेवतात. त्यामुळे तुमचे आर्थिक मॅनेजमेंट एकमद सोपे होऊ शकते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Power In Your Pocket: माणसाला खर्च झाल्याचे दु :ख कधीच होत नाही. पण, त्याचा हिशोब लागला नाही की खूप वाईट वाटते. असे एक-दोघांच्या नाहीतर सर्वांच्या बाबतीत घडते. त्यामुळे तुम्ही या कॅटेगरीत येत असल्यास, आम्ही तुमच्यासाठी काही खास अ‍ॅप घेऊन आलो आहोत. जे तुमच्या खर्चांपासून पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत सर्वच गोष्टींचे मॅनेजमेंट करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही वही-पेनचा वापर हिशोब ठेवायला करत असल्यास, या अ‍ॅपचा वापर करणे तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. कारण, यावरून तुम्ही कधीही आणि कुठेही तुमच्या हिशोबावर नजर ठेवू शकणार आहात. यामुळे तुमच्यावरचे बरेच टेन्शन कमी व्हायला मदत होणार आहे. हे अ‍ॅप अ‍ॅंड्राॅईड (Android) आणि आयओएसमध्ये (iOS) उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही हे सहज डाउनलोड करू शकता.  

मनी मॅनेजर (Money Manager)

तुमच्या दैनिक, साप्ताहिक आणि वार्षिक कॅटेगरीच्या आधारावर खर्चांचा सर्व आराखडा तुम्हाला या अ‍ॅपमध्ये एकाच जागी पाहता येतो. यासाठी तुम्हाला तुमचे खर्च आणि बचतीची माहिती अ‍ॅपमध्ये अपडेट करत राहावी लागणार आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या खर्चांसह बचत, विमा, लोन आणि संपत्तीचा हिशोब योग्यरित्या ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला तुमची आर्थिक सुधारणा चार्टद्वारे पाहता येणार आहे. यामुळे तुम्हाला पैशांचे मॅनेजमेंट करणे सोपे जाऊ शकते. तसेच यात तुम्ही तुमचा बजेटही सेट करू शकणार आहात.

गुडबजेट (Goodbudget)

हे अ‍ॅप तुमच्या घरगुती बजेटसाठी सर्वात बेस्ट आहे. म्हणजे, तुम्ही तुमचे घरभाडे, किराणा, बाहेर जेवणाचा खर्च आणि अन्यही खर्च मॅनेज करू शकता. तसेच, या अ‍ॅपचा वापर तुम्ही एकापेक्षा अधिक डिव्हाईसवर करू शकता. त्यामुळे कोणत्याही डिव्हाईसवर तुम्ही याचा वापर करत असल्यास, तुमचा डेटा बॅकअप करू शकता. तसेच, उत्पन्न व खर्च रिपोर्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या कॅशफ्लोवर ट्रॅक ठेवू शकता. या अ‍ॅपमध्ये खर्चा संबंधी बऱ्याच कॅटेगरी असल्याने तुमचा वेळ वाचू शकतो.

मनीफाय (Monefy)

या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे वेगवेगळे खर्च जसे की, ट्रान्सपोर्ट, फूड किंवा हेल्थ यावर ट्रॅक ठेवू शकता. तसेच, चार्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या खर्चांच्या वाढीवर लक्ष ठेऊ शकता. तसेच, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता, तिची नोंद तुम्ही एका क्लिकवर या अ‍ॅपमध्ये करू शकता. याचबरोबर तुम्ही तुमच्या पर्सनल फायनान्सचा डेटा गुगल ड्राईव्हवर बॅकअप करू शकता. एवढेच नाहीतर द्याव्या लागणाऱ्या पेमेंटचे रिमाईंडरही सेट करू शकता. त्यामुळे हे अ‍ॅप खास आहे.

मनी लव्हर (Money Lover)

हे अ‍ॅप नावासारखेच आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मासिक किंवा वार्षिक खर्चांवर ट्रॅक ठेवण्याची परवानगी देते. यामध्ये बजेट प्लॅनिंग, बिल रिमाईंडर्स आणि इन्कम ट्रॅकर यासारखे महत्वाचे फिचर्स आहेत. जे तुमची आर्थिक स्थिरता टिकवायला मदत करू शकते. या अ‍ॅपद्वारे चार्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या खर्चांवर ट्रॅक ठेऊ शकते. तुम्ही ट्रॅव्हलर असल्यास, तुमच्यासाठी हे अ‍ॅप खास आहे. कारण, हे अ‍ॅप सर्व करन्सीला सपोर्ट करते. तसेच, तुम्ही तुमचा डेटा सर्वच डिव्हाईसवर अ‍ॅक्सेस करू शकता.