Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best MIS Plan: नियमित मासिक उत्पन्नासाठी बेस्ट इन्वेस्टमेंट प्लॅन जाणून घ्या!

Best Monthly Investment Plan

Best MIS Plan: नियमित मासिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या विविध गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. ज्यातून गुंतवणूकदाराला या वर्षभरात चांगला परतावा मिळू शकतो. अशाच निवडक 10 योजनांची माहिती आपण घेणार आहोत.

सध्या जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था एका संक्रमणातून जात आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकांकडून सावधगिरीने निर्णय घेतले जात आहेत. वाढत्या महागाईबरोबरच कर्जाचे व्याजदरदेखील वाढत आहे. अशावेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नाची धास्ती आहे. अशावेळी आपली गुंतवणूक सुरक्षित राहून त्यातून नियमित उत्पन्न कसे मिळेल. अशा योजनांच्या शोधात गुंतवणूकदार आहेत. आज आपण 2023 या वर्षात मासिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या अशाच बेस्ट 10 योजनांची माहिती घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme)

पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी Post Office Monthly Income Scheme ही लोकप्रिय अशी सरकारी योजना आहे. ही खूपच कमी जोखीम असलेली योजना मानली जाते. यातून गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला फिक्सड् व्याज मिळते. ज्यांना प्रत्येक महिन्याला उत्पन्न हवे आहे. त्यांच्यासाठी ही योजना चांगला पर्याय आहे. याचा गुंतवणूक कालावधी 5 वर्षांचा असून यामध्ये किमान 1,500 रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेतील गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80Cनुसार कर बचतीचा लाभदेखील घेता येतो.

इक्विटी शेअर लाभांश (Equity Share Dividends)

शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या कंपनीला जेव्हा मार्केटमधून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. तेव्हा ती कंपनी त्या नफ्यातील काही भाग लाभांशच्या रुपाने आपल्या भागधारकांनाही देखील देते. काही कंपन्या हा लाभांश नियमित देतात. यामुळे अशा कंपन्यांचे शेअर्स असलेल्या गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला यातून नियमितपणे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे जे गुंतवणूकदार काही प्रमाणात जोखीम स्वीकारून शेअर्सच्या माध्यामातून लाभांश मिळवू शकतात.

ॲन्युटी प्लॅन (Annuity Plans)

ॲन्युटी प्लॅन हा गुंतवणूकदारांना त्यांच्या निवृत्तीच्या काळात नियमित उत्पन्न मिळवून देणारा पर्याय आहे. एकरकमी गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला किंवा नियमित उत्पन्न मिळवून देणारी योजना आहे. ॲन्युटी प्लॅनचे वेगवेगळे प्रकार आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स लागू होतो. पण यामध्ये केलेली गुंतवणूक ही कमी जोखमीची मानली जाते.

दीर्घकालीन सरकारी बॉण्ड्स (Long-Term Government Bonds)

सरकारकडून नियमितपणे 10 वर्षांचे बॉण्ड्स इश्यू केले जातात. या बॉण्ड्सवर सरकार नियमितपणे फिक्स इंटरेस्ट देते. त्यामुळे ही गुंतवणूक सर्वांत सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. याचा गुंतवणुकीचा कालावधी जास्त असल्यामुळे कमी मुदतीच्या योजनांवर मिळाणाऱ्या व्याजदरापेक्षा याचा व्याजदर जास्त असू शकतो. या बॉण्ड्समधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स लागू होतो आणि या बॉण्ड्सची खरेदी-विक्री स्टॉक एक्सचेंजवर केली जाते.

कॉर्पोरेट डिपॉझिट (Corporate Deposits)

कॉर्पोरेट डिपझिट हा सुद्धा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. या स्कीमद्वारे ठराविक कालावधीकरीता गुंतवणूक केली जाते आणि यावर गुंतवणूकदाराला फिक्स व्याज मिळते. कॉर्पोरेट डिपॉझिट हे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विकले जातात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सरकार टॅक्स आकारते.

मासिक उत्पन्न प्लॅन (Monthly Income Plans)

ज्या गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न अपेक्षित आहे. त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट आहे. या योजनेतून गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळू शकतो. पण त्याचबरोबर यातून मिळालेल्या उत्पन्नावर सरकार टॅक्स आकारते.

सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (Senior Citizen Saving Scheme)

सिनिअर सिटिझिन सेव्हिंग स्कीममध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेवर संपूर्ण कालावधीसाठी फिक्स व्याज दिले जाते. यात किमान 1 हजार रुपये आणि कमाल 30 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेला सरकारचे पाठबळ असल्यामुळे यातील जोखमीचे प्रमाण खूपच कमी आहे. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C नुसार कर सवलतीचा फायदा घेता येतो.

लाईफ इन्श्युरन्स प्लस सेव्हिंग (Life Insurance Plus Saving)

लाईफ इन्श्युरन्स प्लस सेव्हिंग या योजनेद्वारे गुंतवणूकदार एकाचवेळी दोन गोष्टी साध्य करू शकतो. एकतर यामधील लाईफ कव्हरमधून पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते. त्याचबरोबर  यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर नियमित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. या योजनेतून इन्कम टॅक्सचा लाभदेखील घेता येतो.

प्रधानमंत्री वय वंदन योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana)

प्रधानमंत्री वय वंदन योजना ही केंद्र सरकारतर्फे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जाणारी निवृत्ती योजना आहे. या योजनेतून लाभार्थ्यांला 10 वर्षांसाठी 7 ते 9 टक्क्यांपर्यंत खात्रीशीर असा परतावा मिळू शकतो. या योजनेत ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात. यामधून मिळणाऱ्या व्याजावर सरकार टॅक्स आकारते. तसेच यामध्ये केलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. ही योजना सरकारची असल्यामुळे यामध्ये जोखीम खूपच कमी आहे.

सिस्टेमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन (Systematic Withdrawal Plans)

सिस्टेमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन (Systematic Withdrawal Plans-SWP)  हा एक गुंतवणुकीचा असा पर्याय आहे. ज्यातून गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक अशा पद्धतीने नियमित उत्पन्न मिळू शकते. या योजनेतून गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम मिळवण्याची सुविधा आहे. यासाठी त्याला या योजनेमध्ये एकरकमी रक्कम गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ज्यांना प्रत्येक महिन्याता नियमित उत्पन्न अपेक्षित आहे. त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.