Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best ELSS Fund: या टॅक्स सेव्हिंग फंडांनी वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला 19 ते 25 टक्क्यांपर्यंत परतावा

Best ELSS Fund June 2023

Image Source : www.idfcfirstbank.com

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Association of Mutual Funds in India-AMFI) या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जवळपास 8 ईएलएसएस म्युच्युअल फंडांनी वर्षभरात 19 ते 25 टक्के परतावा दिला आहे. असे कोणते फंड आहेत; ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Best ELSS Fund: नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन दोन महिने लोटले आहेत. तुम्हाला मिळत असलेल्या उत्पन्नावर टॅक्स लागत असेल तर टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड (ELSS) हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचा लाभही घेता येईल आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्यातून तुमचा आर्थिक फायदा होऊ शकतो.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Association of Mutual Funds in India-AMFI) या संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जवळपास 8 ईएलएसएस म्युच्युअल फंडांनी वर्षभरात 19 ते 25 टक्के परतावा दिला आहे. असे कोणते फंड आहेत; ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. अशा फंडबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Motilal Oswal Long Term Equity Fund

मोतीलाल ओस्वाल लॉन्ग टर्म इक्विटी फंडमध्ये डायरेक्ट प्लॅननुसार गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 25.11 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 23.57 टक्के परतावा आला आहे.

SBI Long Term Equity Fund

एसबीआय म्युच्युअल फंड हाऊसच्या एसबीआय लॉन्ग टर्म इक्विटी फंडने गुंतवणूकदारांना डायरेक्ट गुंतवणुकीतून वर्षभरात 22.88 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 22.10 टक्के परतावा दिला आहे.

JM Tax Gain Fund

जे एम टॅक्स गेन फंडने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना डायरेक्ट प्लॅनमधून 20.05 टक्के परतावा दिला आहे. तर रेग्युलर प्लॅनमधून गुंतवणूकदारांना 18.90 टक्के परतावा दिला आहे.

Kotak Tax Saver Fund

कोटक म्युच्युअल फंड कंपनीच्या कोटक टॅक्स सेव्हर फंडने गुंतवणूकदारांना वर्षभरात डायरेक्ट प्लॅनमधून 19.90 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 23.57 टक्के परतावा दिला आहे.

HDFC Tax Saver Fund

एचडीएफसी कंपनीच्या एचडीएफसी टॅक्स सेव्हर फंडने गुंतवणूकदारांना एका वर्षभरात डायरेक्ट प्लॅनमधून 19.78 टक्के आणि रेग्युलर प्लॅनमधून 19.04 टक्के परतावा दिला आहे.

Bandhan Tax Advantage (ELSS) Fund

बंधन टॅक्स अॅडव्हानटेजेस (ईएलएसएस) फंडमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात डायरेक्ट प्लॅनमधून 19.52 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 18.12 टक्के परतावा दिला आहे.

ITI Long Term Equity Fund

आयटीआय लॉन्ग टर्म इक्विटी फंडमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात डायरेक्ट प्लॅनमधून 19.40 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 17.09 टक्के परतावा दिला आहे.

Bank of India Tax Advantage Fund

बँक ऑफ इंडियाच्या टॅक्स अॅडव्हानटेज फंडने गुंतवणूकदारांना वर्षभरात डायरेक्ट प्लॅनमधून 19.30 टक्के तर रेग्युलर प्लॅनमधून 17.90 टक्के परतावा दिला आहे.

अशा विविध म्युच्युअल फंड हाऊसच्या टॅक्स सेव्हिंग फंडामधून गुंतवणूकदारांना कर बचतीच्या सुविधेसह चांगला परतावा मिळू शकतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी)च्या वेबसाईटवर देण्यात आलेली ही माहिती मागील वर्षभराची आहे. यामध्ये मागील 3 किंवा 5 वर्षांचा परतावा तपासून योग्य फंडाची निवड करू शकता.

(डिसक्लेमर: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)