Best cars: कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्याची ही सर्वात चांगली वेळ आहे कारण जवळजवळ प्रत्येक उत्पादकाकडे दिवाळीसाठी सूट आणि ऑफर असतात, ज्यामुळे खरेदीदाराला दिवाळीच्या सणासुदीला खरेदी करणे फायदेशीर ठरते. तुम्हाला जर या दिवाळीत कार खरेदी करायची असेल तर या 5 Suv (sport-utility vehicle) तुमच्यासाठी. (Best cars to buy this Diwali)
Table of contents [Show]
1. टोयोटा अर्बन क्रूझर (Toyota Urban Cruiser)
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे आणि त्यासोबतच सर्वोत्कृष्ट भारतीय SUV आहे. BS6 सह मारुती सुझुकीने या जबरदस्त एसयूव्हीला बेस्ट सेलर, डिझेल ब्रेझा ऐवजी स्ट्रॉंग पेट्रोल इंजिन दिले आहे. टोयोटा अर्बन क्रूझर हे फक्त ब्रेझा पेक्षा दिसायला आकर्षक आहे आणि बॉडी मध्ये काही चेंज आहे. सर्व-नवीन-विटारा ब्रेझा आणि अर्बन क्रूझर आता 1.5L K-सिरीज पेट्रोल इंजिनसह येतात जे 103 bhp@6000rpm आणि पीक टॉर्क 138Nm@4400rpm जनरेट करते. ब्रेझा 2 ट्रान्समिशन ऑप्शन सुद्धा देते मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक. या कारची किमत 9 लाखांपासून सुरू होते.
2. टाटा नेक्सॉन (Tata Nexon)
टाटा नेक्सॉन ही भारतीय पॅसेंजर सर्वोत्तम कारपैकी एक आहे. 2018 मध्ये, कारला ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली, ज्याने तिला "वर्षातील सर्वात सुरक्षित कार" घोषित केले. गेल्या सणासुदीच्या 3 महिन्यांत टाटा नेक्सॉनची व्हॉल्यूम सरासरी 6000 युनिट्सच्या जवळपास होते आणि त्याची लोकप्रियता अजूनही वाढत आहे. 1.2L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 1.5L टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT) ट्रान्समिशन ऑप्शन देखील आहे. नेक्सॉन EV ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. नेक्सॉन XM (S) प्रकारात इलेक्ट्रिक सनरूफ, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्ट, ऑटो हेडलाइट्स, रेन-सेन्सिंग वायपर्स आणि हरमन कार्डन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. या कारची किंमत 7.60 लाखांपासून सुरू होऊन 14.8 लाखांपर्यंत जाते.
3. महिंद्रा XUV 300 (Mahindra XUV300)
महिंद्र ही परवडणाऱ्या रेंजमध्ये स्ट्रॉंग SUV देणारी कार उत्पादक कंपनी आहे. महिंद्रा 1.2L पेट्रोल इंजिन आणि 1.5L डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटसह आहे. XUV300 ही कार भारतीय बाजारपेठेतील एक भन्नाट ऑफर आहे कारण ती पावर आणि परफॉर्मन्समध्ये संतुलन ठेवते. या कारची किंमत 8.41 लाखांपासून सुरू होऊन 14.7 लाखांपर्यंत जाते.
4. ह्युंदाई साईट (Hyundai site)
ह्युंदाई भारतीय कार बाजारपेठेतील इतर स्पर्धकांपेक्षा कधीही कमी नाही. साईट 1.2L पेट्रोल आणि 1.4L डिझेल इंजिनसह अनेक गिअरबॉक्स ऑप्शनसह येते. मॅन्युअल, CVT, DCT, आणि iMT (इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन). कार एंट्री-लेव्हल एसयूव्ही मजेदार बनवते कारण या कारमध्ये तुम्हाला अनेक टेक्निकल आणि सोयीस्कर ऑप्शन मिळतात.
5. किआ सोनेट (Kia Sonet)
किआ सोनेटने लॉन्च झाल्यापासून भारतीय कार बाजारात तुफान कब्जा केला आहे. सोनेटला 2 महिन्यांत 50 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले. SUV पेट्रोल आणि डिझेल ड्राइव्हट्रेनमध्ये चार वेगवेगळ्या गिअरबॉक्स ऑप्शन उपलब्ध आहेत. मॅन्युअल, ऑटोमॅटिक पर्यायांमध्ये CVT, DCT आणि iMT हे समाविष्ट आहे. Kia Sonet 10.25-इंच एचडी टचस्क्रीन, इंफोटेनमेंट, BOSE ऑडिओ, इलेक्ट्रिक आणि हीट फ्रंट सीट्स, प्लश लेदर इंटीरियर्स, 57 कनेक्टेड कार ही वैशिष्टे आहेत. या कारची किंमत 7.49 लाख इतकी आहे.