दोन प्लेट पाणी-पुरी खाल्ल्यानंतर “सुकी पुरी” आपण हक्क असल्यासारखं मागून घेतो. “Piping hot” पिझ्झावर “extra topping” कोणाला नको असतात! पिझ्झावरील topping काय किंवा सुखी पुरीनं होणारा चाट-पार्टीचा शेवट काय, प्रत्येकाला "थोडं तरी extra" मानसिक समाधान हवच असतं ना! आयुष्याबाबतचे निर्णय घेताना मात्र आपण "थोडा extra"चा का नाही विचार करत. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित आर्थिक भविष्याचा विचार करून "टर्म इन्शुरन्स प्लॅन" घेणे केव्हाही कालसुसंगत विचार आहे. मात्र त्याच सोबत आपल्या मृत्यू-व्यतिरिक्त देखील आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्रोत थांबविणाऱ्या संभाव्य घटनांचा विचार करून त्याबाबतचा निर्णय घेणे, म्हणजेच "थोडे extraaaaaa"!!!
ज्या क्षणी आपल्याला आयुष्याचे मूल्य समजते, तेव्हा आपण “टर्म इन्शुरन्स प्लॅन” घेऊन आपल्यापश्चात आपल्या कुटुंबाला किमान आर्थिक स्थिरता निश्चित करतो. मात्र आयुष्य केवळ अमूल्यच नव्हे, तर अकल्पित घटनांच्या series ने भरलेलं आहे. नियत वयोमानामुळे संपणारे आयुष्य आपल्या मागे राहिलेल्या लोकांना सावरायला संधी तरी देते. परंतु आकस्मित, कोणतीही कल्पना न देता, एखाद्या जीवघेण्या अपघातामुळे घेतलेली “without warning EXIT” असो, किंवा अचानक निदान झालेले दुर्धर आजाराचे निदान असो, आयुष्याची आकस्मितता जेव्हा समजते, तेव्हा व्यक्ती “ॲड-ऑन (Add-on)” अर्थात “रायडर” देखील निवडते. अनेक तरुण व्यक्ती तत्कालीन फायदे बघून किंवा संभाव्य धोके विचारात न घेता केवळ “PureTermPlan” खरेदी करतात. किंबहुना, बहुतेक लोक टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी केवळ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम (Sum Assured) आणि प्रीमियमची भरावी लागणारी रक्कम लक्षात घेऊन “कशाला हवाय रायडर ??” असा विचार करून रायडर नाकारतात.
Table of contents [Show]
प्रत्येक विमा कंपनी टर्म प्लॅनसोबत “ॲड-ऑन” ऑफर करते
अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व लाभ (Accidental Death or Disability Rider)
अपघात प्राणघातक होऊ शकतो किंवा अपंगत्व होऊ शकतो. या परिस्थितींमध्ये, तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना कठीण परिस्थितीचा सामना करण्यास मदत करण्यासाठी रायडर अतिरिक्त पेआउट प्रदान करतो.
गंभीर आजार लाभ(Critical Illness Benefit Rider)
हृदयविकाराचा झटका किंवा त्यामध्येही कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांशी झुंज देताना हॉस्पिटलायझेशन, केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया इ. गोष्टीचा समावेश होतो. पॉलिसीधारकाला त्यापैकी एकाचे निदान झाल्यास, ॲड-ऑन पे-आउट ऑफर करते. मिळालेले पैसे पॉलिसीधारकाच्या उपचारांसाठी किंवा त्याच्या कुटुंबाचे गमावलेले उत्पन्न बदलण्यासाठी वापरता येऊ शकते. आज-काल कॅन्सर-बाधित होण्याचे वाढते प्रमाण आणि त्यावरील उपचाराचा अवाढव्य वैद्यकीय खर्च (medical expenses) बघता “क्रिटिकल इलनेस रायडर”चे संरक्षण असणे केव्हाही दुरदृष्टीचे ठरते.
प्रीमियम भरण्याची सूट (Waiver of Premium Rider)
गंभीर आजाराचे निदान झाल्यास किंवा अपघातानंतर अपंगत्व आल्यास रायडर भविष्यातील प्रीमियम्स माफ करतो. त्यामुळे पॉलिसीधारकाला यापुढे नियमित प्रीमियम भरावा लागत नाही. आणि पॉलिसी लॅप्स न होता, चालू (active) राहते. भविष्यात नॉमिनीला आर्थिक सुरक्षितता मिळू शकते.
ॲड-ऑन निवडताना काही महत्वाचे मुद्दे
- ॲड-ऑन निवडताना, आपण आपली जीवनशैली, आपल्या सवयी, आपली मेडिकल हिस्ट्री, आपल्या आर्थिक गरजा आणि आपल्या व्यवसायामधील संभाव्य धोके / जोखीम (hazards / risk) यांचा विचार करावा.
- टर्म प्लॅनची खरेदी करीत असताना केल्या गेलेल्या मेडिकल टेस्ट्स रायडर खरेदीला वैध असतात. अतिरिक्त वैद्यकीय चाचण्यांची आवश्यकता नसते.
- टर्म इन्शुरन्समध्ये सोबत घेतलेले “ॲड-ऑन” पॉलिसीधारकाला किंवा त्याच्या अनुपस्थितीमध्ये मूळ विम्याच्या रक्कमेपेक्षा (Sum Assured) अधिकची रक्कम (पे-आउट) देतात.
- “अपघाती मृत्यूची घटना”, “मृत्यू न येता आलेले आंशिक किंवा कायमस्वरूपी अपंगत्व” किंवा “गंभीर आजाराचे निदान ” केवळ पॉलिसीधारकावरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबावर दूरगामी मानसिक, भावनिक आणि मुख्यतः आर्थिक परिणाम घडवून आणते.
- मात्र “ॲड-ऑन” सारखे “इमर्जन्सी-कव्हर” आपले लाईफ-कव्हर अधिक भक्कम बनवितो. तेव्हा टर्म प्लॅन घेताना तुम्ही देखील “केवळ वाढीव प्रिमिअमच्या रक्कमेचा” विचार न करता उपलब्ध रायडर्स तपासा आणि तुम्हाला आवश्यक असलेले “ॲड-ऑन” फायनलाईझ करा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदे मिळू शकतील.