भारतामध्ये सौंदर्य प्रसाधनांची मोठी बाजारपेठ आहे. भारतीय कंपन्यांसोबतच अनेक परदेशी ब्रँड्सही भारतामध्ये आहेत. भारतामध्ये गोऱ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे. गोऱ्या रंगाचा संबंध थेट सौंदर्याशी लावला जातो. त्यामुळे पुरुष आणि महिला दोघांनाही सौंदर्यप्रसाधने कंपन्यांकडून टार्गेट केलं जाते. यामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून उत्पादने बनवली जायची. मात्र, आता हे चित्र पालटत आहे. मागील पाच वर्षात आशिया पॅसिफिक देशांशी तुलना करता भारतामध्ये सर्वाधिक ब्युटी प्रॉडक्ट्स पुरुषांसाठी लाँच करण्यात आली.
किती ब्युटी प्रॉडक्ट्स भारतात लाँच झाली(Beauty products launched in India)
इतर देशांशी तुलना करता दर पाच ब्युटी उत्पादनांपैकी एक प्रॉडक्ट भारतामध्ये लाँच करण्यात आले. आशिया पॅसिफिक रिजनमध्ये भारताने आघाडी घेतली आहे. ही नव्याने लाँच झालेली उत्पादने पुरुषांसाठी खास तयार करण्यात आली. ग्लोबल कन्झ्युमर रिसर्च फर्म मिन्टेलने याबाबतची आकडेवारी जाहीर केले आहे. मागील पाच वर्षात 20% ब्युटी प्रॉडक्ट्स भारतामध्ये लाँच करण्यात आली. त्याखालोखाल चीनमध्ये 15% आणि जपानमध्ये 10% प्रॉडक्ट्स लाँच करण्यात आली. कोरोनानंतर पुरुषांसाठी तयार करण्यात येणाऱ्या ब्युटी प्रॉडक्ट्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, असे अहवालात म्हटले आहे.
सेल्फी कल्चरमुळे पुरुषांना दिसायचंय सुंदर (social media and Selfie Culture boosted beauty product growth)
मेट्रो आणि लहान शहरांमधील तरुणांमध्ये सुंदर दिसण्याची जाणीव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडिया, इ कॉमर्स आणि इतर मार्केटिंग माध्यमातून उत्पादनांची विक्री वाढली आहे. तरुण सलूनमध्ये बिनदिक्कतपणे येत आहेत. सोशल मीडिया आणि सेल्फी कल्चरमुळे तरुणांमध्ये ब्युटी उत्पादनांची मागणी वाढली आहे, असे लोटस हर्बलचे संचालक नितीन पासी यांनी म्हटलं आहे. जी ब्युटी उत्पादने पुरुषांसाठी बनवण्यात आली नाहीत, त्या उत्पादनांनाही पुरुषांची पसंती मिळत आहे, असे गुड ग्लॅम ग्रुपच्या सीईओ सुखलिन अनेजा यांनी म्हटलं आहे.
ब्युटी उत्पादनांमधील टॉप कंपनी (Top beauty products companies in India)
लोटस हर्बल (Lotus Herbals Pvt Ltd)
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (Unilever Limited)
लोआरियल (L'Oréal SA)
वेलवेटे लाइफस्टाइल प्रायव्हेट लिमिटेड (Vellvette Lifestyle Private Limited)
नॅच्युरा अँड कंपनी (Natura & Co)
महिलांप्रमाणे पुरुषांचाही सुंदर दिसण्यावर भर
स्कीन केअर उत्पादनांची मागणी भारतीय पुरुषांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. महिला जेवढं सौंदर्याला महत्त्व देतात, तेवढंच आता आम्हीही सुंदर दिसण्याला महत्त्व देतो, असे 80% पेक्षा जास्त पुरुषांचे असे म्हणणे आहे, असे मिनटेल कंपनीतील सिनियर अॅनालिस्ट तानिया रजानी यांनी म्हटले. सुंदर त्वचेबरोबरच ऑइल फी स्कीन(56%), अक्ने(त्वचेवरील पुरळ) फ्री स्कीनसाठी(53%) असलेल्या उत्पादनांनाही पुरुषांकडून मागणी आहे. मागील सहा महिन्यात 28% पुरुषांनी ऑनलाइन ब्युटी प्रॉडक्स खरेदी केली, असे रजानी यांनी म्हटले.
पुरुषांच्या कोणत्या उत्पादनांना मागणी? (Which beauty products famous in men)
शेविंग क्रिम, जेल, फोम, बार सोप्स, बॉडी वॉश, शॉवर जेल, फेअरनेस क्रिम, हेअर केअर जेल, रिसम, हेअर स्टायलिंग जेल यांनाही मोठी मागणी आहे. पुरुषांसाठी सौंदर्य प्रसाधनांचे भारतातील मार्केट 10 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. यामध्ये मोठी वाढ होत आहे. मेल ग्रुमिंग मार्केट 8 ते 9% वेगाने वाढत असल्याचे बॉम्बे शेविंग क्रिम कंपनीचे संस्थापक दिपक गुप्ता यांनी म्हटले. भारतामध्ये ब्युटी आणि पर्सनल केअर उत्पादनांचे एकूण मार्केट 27 बिलियन डॉलर आहे. यामध्ये दरवर्षी सुमारे साडेतीन ते चार टक्के वाढ होत आहे. यातील फक्त पर्सनल केअर उत्पादनांचा वाटा 12 बिलियन डॉलर 2023 च्या आकडेवारीनुसार आहे.