कार खरेदी करताना कार इन्शुरन्सचा देखील विचार करावा लागतो. भारतात वाहनासोबत विमा पॉलिसी खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र वाहनासाठी विमा घेताना कोणत्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे, ते जाणून घेऊया.(Check List before taking best Car Insurance)
Table of contents [Show]
गरजा समजून घ्या (Understand The Need)
कार इन्शुरन्स घेताना आपल्या गरजा ओळखणे महत्वाचे आहे. कार विमा घेण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. भारतात ते सक्तीचे आहे म्हणून घ्यायचे आहे तुम्ही अधिक काही कार पॉलिसीमध्ये कव्हर व्हावे असे वाटते, याचा विचार करा. उदा. तुमची गाडी जुनी असेल आणि लवकरचं तुम्ही नवी घेणार असाल तर अशा स्थितीत थर्ड पार्टी पॉलिसी पुरेशी मानली जाते.
बजेट ठरवा (Decide Budget)
कार इन्शुरन्स घेताना आपले बजेट ठरवणे सुद्धा आवश्यक असते. फोर व्हीलर इन्शुरन्स प्लॅन अनेक प्रकारामध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे त्यांच्या किंमतीही भिन्न भिन्न असतात. यामुळे आपल बजेट ठरवणे आणि त्यानुसार पॉलिसी बघण आवश्यक असतं. कमी पॉलिसी तीचं उत्तम असे न मानता त्यात काय काय कव्हर होते आणि आपल्या गरजा काय आहेत, याची सांगड घालणे महत्वाचे असते.
विमा पॉलिसींमध्ये तुलना करा (Compare With Other Car Insurance Policies)
आपण पॉलिसी घेत असताना तुलना करून बघणे उपयुक्त ठरते. ही तुलना केवळ भराव्या लागणाऱ्या रकमेची नाही तर पॉलिसी मधल्या तरतुदींचीही करावी. अशी तुलना ऑनलाईन करणे सोईस्कर आहे. यामुळे पॉलिसीचे वेगवेगळे पर्याय आपल्याला एकत्र बघता येतात. यामुळे तुमचे बजेट आणि गरज यांचा विचार करून सर्वोत्तम पॉलिसी खरेदी करू शकता.
दीर्घकालीन प्लॅन घेऊ शकता का याचा विचार करा (Opt For Long Term Policy)
दोन ते तीन वर्षाच्या कालावधीसाठी एकदाच पॉलिसी खरेदी करू शकता. तसे करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे पहिल्याच वर्षी मोठी रक्कम भरावी लागेल. पण दरवर्षी वैयक्तिकरित्या प्रीमियम भरण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे पॉलिसीच्या भविष्यात वाढणाऱ्या किंमतीचा खिशावर परिणाम होणार नाही. त्यामुळे तुमचे बजेट लक्षात घेऊन याचा देखील विचार करू शकता.
कार इन्शुरन्स घेताना या मूलभूत गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. याचबरोबर पॉलिसी तपासताना बजेट आणि गरजा यांचा मेळ घालणे आवश्यक आहे. अन्यथा पॉलिसी घेताना नीट माहिती घेतली नसेल तर प्रत्यक्ष क्लेम करण्याची वेळ आलीच तर यावेळी पश्चाताप होऊ शकतो. तेव्हा चुकीची पॉलिसी घेऊन आपण आपलें पैसे फुकट घालवल्याची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून कार इन्शुरन्स घेताना पुरेशी माहिती घेणे आवश्यक आहे.