बचत खात्यांवर 7% ते 7.5% व्याज दर देणाऱ्या बँका आपण पाहणार आहोत. या बँकांनी नोव्हेंबर 2022 मध्ये बचत खात्याच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. बचत खात्यासाठी किमान सरासरी शिल्लक ठेवावी लागते. येस बँकेच्या वेबसाइटनुसार, "योजना आणि शाखा श्रेणी (मेट्रो/शहरी/सेमी-अर्बन/ग्रामीण) वर अवलंबून, बॅलन्सचे 3 प्रकार पडतात. सरासरी मासिक बॅलन्स (एएमबी), सरासरी तिमाही बॅलन्स (एक्यूबी) आणि सहामाही सरासरी बॅलन्स आहे."
Table of contents [Show]
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank)
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ही एकमेव बँक आहे जी आता 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत बँक ठेवींवर 7.5% दराने व्याज देते. बँक विविध रकमेवर 3.50% ते 7.50% दरम्यान व्याज दर देते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडे असलेले व्याजदर खाली दिले आहेत.
रक्कम | व्याज दर (वार्षिक) |
1 लाख रुपयांपर्यंत | 3.50% |
1 लाख ते 5 लाख रुपये | 6.00% |
5 लाख ते 25 करोड रुपये | 7.00% |
25 करोड रुपये | 7.50% |
इक्विटास स्मॉल फायनान्स बँका (Equitas Small Finance Banks)
इक्विटास स्मॉल फायनान्स बँका विविध रकमेवर 3.50% ते 7% दरम्यान व्याज दर देतात. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेकडे असलेले व्याजदर खाली दिले आहेत.
डेली क्लोजिंग बॅलन्स | रेट स्लॅब |
1 लाख रुपयांपर्यंत | 3.50% |
1 लाखांपेक्षा जास्त आणि 5 लाख रुपयांपर्यंत | 5.50% |
5 लाख रुपयांपासून ते 5 करोड रुपयांपर्यंत | 7.00% |
5 करोड रुपयांपासून ते 10 करोड रुपयांपर्यंत | 5.50% |
10 करोड रुपयांपासून ते 30 करोड रुपयांपर्यंत | 5.00% |
30 करोड रुपयांपेक्षा जास्त | 7.00% |
जन स्मॉल फायनान्स बँका (Jana Small Finance Banks)
जन स्मॉल फायनान्स बँक विविध रकमेवर 4.50% ते 7% दरम्यान व्याज दर देते. खालीलनुसार व्याजदर आहेत.
कालखंड | व्याजदर वार्षिक ( < 2 करोड रुपये) | व्याजदर वार्षिक (2 करोड रुपये आणि त्याहून अधिक रक्कम ) |
7-14 दिवस | 3.00% | 3.00% |
15-60 दिवस | 6.60% | 6.60% |
61-90 दिवस | 6.60% | 6.60% |
91-180 दिवस | 7.05% | 7.05% |
181-364 दिवस | 7.20% | 7.20% |
1 वर्ष- 2वर्ष | 8.35% | 8.35% |
>2 वर्ष- 3 वर्ष | 7.35% | 7.35% |
>3 वर्ष- >5 वर्ष | 7.45% | 7.45% |
5 वर्ष ( 1825 दिवस) | 7.35% | 7.35% |
>5 वर्षे- 10 वर्षे | 6.10% | 6.10% |
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank)
युनिटी स्मॉल फायनान्स बँक विविध रकमेवर 6% ते 7% दरम्यान व्याज दर देते. बचत खात्यांसाठी युनिटी बँक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवींसाठी 7 टक्के वार्षिक आणि 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी 6 टक्के वार्षिक व्याज देते.
रक्कम | दर ( %) |
1 लाख रुपयांपर्यंत | 6.00% |
>1 लाख- 5 लाख | 7.00% |
>5 लाख- 50 लाख | 7.00% |
>50 लाख- 10 करोड | 7.00% |
>10 करोड रूपये | 7.00% |
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक (Shivalik Small Finance Bank)
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक विविध रकमेवर 3.50% ते 7% दरम्यान व्याज दर देते. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत लागू असलेले व्याज दर खाली दिले आहेत
सेव्हिंग्स बँक अकाऊंट | व्याजदर (% प्रति वार्षिक )/ नॉर्मल |
1 लाख रुपयांपर्यंत बॅलन्स | 3.50% |
1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत | 3.50% |
5 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत | 3.50% |
10 लाख रुपयांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत | 4.00% |
25 लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंत | 4.00% |
50 लाख रुपयांपासून ते 1 करोड रुपयांपर्यंत | 4.50% |
1 करोड रुपयांपासून ते 2 करोड रुपयांपर्यंत | 5.00% |
2 करोड रुपयांपासून ते 5 करोड रुपयांपर्यंत | 7.00% |
5 करोड रुपयांपासून ते 7 करोड रुपयांपर्यंत | 7.00% |
7 करोड रुपयांपेक्षा जास्त | 7.00% |