पैशांची गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपल्या सगळ्यांकडेच बँकेत बचत खाते असते. मात्र त्यावर मिळणारा व्याजदर हा फारच कमी असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोक ठराविक रक्कम बचत खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची एफडी (FD) करतात. एफडीवर बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळतो. एफडी ही ठराविक कालावधीसाठी केली जाते. पण आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या बचत खात्यातील गुंतवणुकीवर एफडी इतका व्याजदर देतात. खासगी क्षेत्रातील बंधन बँक,सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक,आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एयु स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यातील रकमेवर एफडी इतका व्याजदर देतात.
Table of contents [Show]
बंधन बँक (Bandhan Bank)
देशातील खासगी क्षेत्रातील बंधन बँक आपल्या ग्राहकांसाठी बचत खात्यातील रकमेवर आकर्षक व्याजदर देत आहे. सध्या बँक 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 3%व्याजदर, 1 लाख ते 10 कोटी रकमेसाठी 6 टक्के व्याजदर आणि 10 लाख ते 2 कोटी पर्यंतच्या रकमेवर 6.25 टक्के व्याजदर देत आहे. तसेच 10 कोटी ते 50 कोटी रकमेवर बँकेकडून 6.50 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
एयु स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank)
खासगी क्षेत्रातील एयु स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांसाठी 1 लाख ते 10 लाख रुपयांच्या रकमेवर 5% व्याजदर देत आहे. तसेच 10 लाख ते 25 लाख रुपयांसाठी 6 टक्के, 25 लाख ते 1 कोटी रुपयांवर 7 टक्के हिशोबाने व्याजदर देत आहे. याशिवाय 1 कोटी ते 2 कोटी बॅलन्स असणाऱ्या बचत खातेधारकांना 7.25 टक्के व्याजदर देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनास बँक (Suryodaya Small Finance Bank)
सूर्योदय स्मॉल फायनास बँक डेली क्लोजिंग बॅलन्सच्या आधारावर बचत खात्यावर 7 टक्क्यापर्यंत व्याजदर देत आहे. बँकेकडून 1 लाख ते 5 लाख रुपयांच्या रकमेवर 6.75 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर 5 लाख ते 50 लाखांच्या बॅलन्सवर 7 टक्के हिशोबाने व्याजदर देत आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank)
आयडीएफसी फर्स्ट बँक देखील आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर सर्वोत्तम व्याजदर देत आहे. बँकेकडून 10 लाखापेक्षा कमी रकमेवर 4% व्याजदर देण्यात येत आहे. तर 10 लाख ते 50 कोटी रुपयांच्या रकमेवर 6.75 टक्के वार्षिक व्याज देण्यात येत आहे.
Source: hindi.moneycontrol.com